नवी दिल्ली : अवकाश संशोधन मोहिमा आता केवळ सरकारी मोहिमा राहिल्या नाहीत; तर त्यात आता खासगी उद्योजकही उतरले आहेत. त्यामुळे लवकरच अवकाश मोहिमांचे अर्थकारण प्रचंड प्रमाणात वाढलेले असणार आहे. जागतिक आर्थिक मंच (WEF) आणि मॅकिन्से अँड कंपनी या व्यवस्थापन सल्लागार कंपनीच्या माहितीनुसार, २०३५ पर्यंत अंतराळ अर्थव्यवस्थेवर खासगी व्यवसायिकांचे वर्चस्व राहणार आहे. जवळपास १.८ ट्रिलियन डॉलर्सची ही गुंतवणूक असणार आहे. ( space economy)
याआधी लो-अर्थ ऑर्बिटमध्ये (LE0) म्हणजेच भूपृष्ठापासून २००-१६०० किलोमीटर उंचीवर मानवी उपस्थिती इतकी ठळकपणे कधीच नव्हती. मात्र स्टारलिंकने २०१९ (२१९) च्या तुलनेत २०२४ मध्ये तब्बल दोन हजारावर उपग्रह प्रक्षेपित केले. स्टारलिंक सॅटेलाइट ट्रॅकर ऑनलाइन टूलने दिलेली ही माहिती थक्क करणारी आहे. स्टारलिंककडे आता लो-अर्थ ऑर्बिटमधील सहा हजार उपग्रहांचा मोठा समूह आहे. या माध्यमातून शंभराहून अधिक देशांची इंटरनेट सेवा मजबूत करण्यात येत आहे.
२०२४ अखेरपर्यंत सुमारे २८० जणांनी व्यक्तींनी LE0 मधील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट दिली. वैज्ञानिक अंतराळ मोहिमा आणि ग्रहांच्या शोधांनीही झेप घेतली आहे.
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘जुनो’ने दोन दशकांतील सर्वांत जवळून उड्डाण केले. फेब्रुवारीमध्ये, ‘जुना’ने गुरूच्या ज्वालामुखीच्या चंद्राच्या आतापर्यंतच्या सर्वांत स्पष्ट प्रतिमा टिपल्या. याच महिन्यात अमेरिकेची इन्ट्युइटिव्ह मशिन्स चंद्रावर सॉफ्ट-लँड करणारी पहिली खाजगी युनिट ठरली. ( space economy)
भारताची शुक्र मोहीम
चीनने जूनमध्ये चंद्राच्या दूरच्या बाजूने चंद्राचे नमुने घेऊन इतिहास रचला. पुढच्याच महिन्यात, भारताने सूर्याचा अभ्यास करणाऱ्या ‘आदित्य L1’ मोहिमेच्या माध्यमातून १.५ दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या ‘सन-अर्थ लॅग्रेंज 1’ भोवती आपली पहिली प्रभामंडल कक्षा पूर्ण केली.
भारताने शुक्र ग्रहाच्या मोहिमेची घोषणा केली आहे. ‘नासा’ आणि युरोपियन स्पेस एजन्सी (इसा) नेही २०२१ मध्ये या मोहीम घोषित केली आहे. यंदाचे वर्षही अंतराळ आणि त्यासंबंधित अर्थव्यवस्था या प्रमुख घडामोडींचे असणार आहे.
जागतिक आर्थिक मंच (WEF) आणि मॅकिन्से अँड कंपनीनुसार, अंतराळ अर्थव्यवस्थेच्या वार्षिक वाढीचा दर सरासरी ९ टक्के असेल. तो जागतिक जीडीपी पेक्षा जास्त असेल. पुढील दशकापर्यंत ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळ या क्षेत्रांत गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत.
अंतराळ पर्यटन येणार आवाक्यात
सद्यस्थितीत अंतराळ पर्यटन हे अब्जाधीशांची चैन मानली जाते. तथापि, यातील तांत्रिक बदलाचा वेग आणि निर्मिती लक्षात घेता ते गतीने वाढेल. नोव्हेंबर २०२४ पर्यंत ब्लू ओरिजिन या यूएस फर्मने अवकाश पर्यटनासाठी विकसित केलेल्या न्यू शेपर्ड या पुन: वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनासह २८ व्यावसायिक सबऑर्बिटल उड्डाणे पूर्ण केली. २०३५ पर्यंत, अंतराळ पर्यटन बाजाराचे वार्षिक मूल्य $१.८-३.३ अब्ज इतके असू शकते, असे डेलॉइट या खाजगी तंत्रज्ञान कंपनीचे मत आहे. कृषी, माहिती तंत्रज्ञान, विमा आणि बांधकाम क्षेत्रांतही उपग्रहांच्या माध्यमांतून आमूलाग्र बदल होणार आहे. ( space economy)
(डाऊन टू अर्थच्या सौजन्याने)
हेही वाचा :
- मंत्र्याच्या चालकाने हॉर्न वाजवल्याने दोन गटात राडा
- तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा
- रॉ ने पाकिस्तानात हत्या घडवल्याचा वॉशिंग्टन पोस्टचा दावा