Home » Blog » Tarar : भारत २४ ते ३६ तासांत हल्ला करणार

Tarar : भारत २४ ते ३६ तासांत हल्ला करणार

पाकिस्तान मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद

by प्रतिनिधी
0 comments
Tarar

नवी दिल्ली : भारत आमच्यावर २४ ते ३६ तासात हल्ला करणार आहे, असा दावा पाकिस्तानाचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी केला. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. (Tarar)

जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याचा चोख उत्तर देण्यासाठी भारताने इशारा दिला असून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिनही सैन्य दलाच्या प्रमुखांशी बैठक घेतली. या बैठकीत सैन्याला कारवाईचे स्वातंत्र दिले आहे. या बैठकीला सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्यदल प्रमुख अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख अडमिरल दिनेश त्रिपाठी, हवाई दलाचे एअर चिफ मार्शल अमरप्रित सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. (Tarar)

पंतप्रधानांनी सैन्याला कारवाईचे स्वातंत्र्य दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.  मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानाचे माहिती मंत्री अताउल्लाह यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, आम्हाला विश्वसनीय गुप्तचर माहिती मिळाली आहे. भारत पुढील २४ ते ३६ तासात पाकिस्तानवर लष्करी हल्ला करणार आहे. मंत्री तरार यांनी एक्स पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की “पाकिस्तानकडे विश्वासार्ह गुप्तचर माहिती आली आहे. भारत पहलगाम घटनेचा खोटा बदला पुढे करुन पुढील २४ ते ३६ तासांत लष्करी हल्ला करु शकतो. कोणत्याही आक्रमक कृतीला निर्णयाक प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही तरार यांनी दिला आहे. ते म्हणाले, पाकिस्तान स्वत: दहशतवादाचा बळी बनवलेला आहे. या संकटाचे दु:ख त्यांना खरोखर समजते. आपण जगात नेहमीच याचा निषेध केला आहे. सत्य उलघडण्यासाठी तटस्थ आयोगाकडून विश्वासार्ह, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशीची ऑफर पाकिस्तानने दिलेली आहे, असे तरार यांनी म्हटले आहे. (Tarar)

हेही वाचा :  

काश्मीरचं नंदनवन पुन्हा फुलू दे…

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00