पुणे : प्रतिनिधी : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे वयाच्या ८३ वर्षी पुण्यात निधन झाले. पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत विकासासाठी आयुष्यभर काम करणारा एक निर्भीड विचारवंत देशाने गमावला आहे.
डॉ. माधव गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ मध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. पुणे आणि मुंबई विदयापीठातून त्यांनी जीवशास्त्राची पदवी घेऊन त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅथेमॅटिकल इकॉलॉजी विषयात पी.एचडी मिळवली. हार्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे आणि उपयोजित गणित शास्त्रशाखेचे फेलो आहेत. त्यांच्या पत्नी सुलोचना गाडगीळ या पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये शास्त्रज्ञ पदावर होत्या. (Dr. Madhav Gadgil has passed away)
गाडगीळ हे बेंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. त्यांच्या अतुलनीय योगदानाबददल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरव केला. त्यांना अनेक संस्थांनी गौरवले आहे. लोकसंख्येचे जीवशास्त्र, सर्वसाधारण पर्यावरण, पर्यावरण-संरक्षण, पर्यावरणाची मानवी बाजू आणि ऐतिहासिक पर्यावरण हे प्रा.डॉ. माधव गाडगीळ यांचे संशोधनाचे विषय होते. त्यांचे २१५हून अधिक संशोधन प्रबंध आणि सहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. (Dr. Madhav Gadgil has passed away)
माधव गाडगीळ हे सह्याद्री पर्वतभागाच्या पर्यावरणीय अहवाल समितीचे (गाडगीळ कमिशनचे) अध्यक्ष होते. भारतातल्या ’पहिले जैवशास्त्रीय संरक्षित वन या कल्पनेचे ते जनक आहेत. पश्चिम घाटातील पर्यावरण अभ्यासासाठी नेमलेल्या गाडगीळ समितीचा अहवा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज झाला आहे. अनेक मूलभूत चर्चा यामुळे सुरू झाल्या. भारत सरकारने यातील शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी कस्तुरीरंगन समिती नेमली. (Dr. Madhav Gadgil has passed away)
डोंगर दऱ्यातून फिरून सह्याद्री पर्वताच्या पर्यावरणाचा गाडगीळ यांनी तयार केलेला अभ्यासपूर्ण ’गाडगीळ अहवाल’ महारष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने फेटाळला. त्यानंतर नियुक्त केलेल्या कस्तुरीरंगन समितीने गाडगिळांच्या काही शिफारसी सौम्य करून, कठोर उपाययोजना वगळून बनवलेला आपला अहवाल सादर केला.