कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची राज्यात चर्चा होती. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे विरुद्ध शिवसेना आमदार निलेश राणे आमने-सामने आल्यामुळे या निवडणुकीत जबरदस्त चुरस होती. पैसे वाटपाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चर्चेस आलेल्या कणकणवली नगरपालिकेत निलेश राणे यांनी बाजी मारली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले. अपेक्षेप्रमाणे वेंगुर्ला आणि सावंतवाडी नगरपरिषदांवर भाजपचा झेंडा फडकला . (In Kankavli, Nilesh Rane is ahead among the Rane brothers)
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र आले होते. तर भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. कणकवलीत नगरपंचायतीमध्ये १५ पैकी ८ जागा भाजपला मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले आहेत. हा नितेश राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध निलेश राणे असा संघर्ष झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगला होता. भाजपचे आमदार नितेश राणे आणि प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण विरुद्ध शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यातील संघर्ष चर्चेत आला होता. त्यातच भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकून रोख रक्कम जप्त करण्यासाठी निलेश राणेंनी पुढाकार घेतल्यामुळे दोन्ही पक्षांतील संघर्ष चिघळला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीत कोण बाजी मारणार याची जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होती. (In Kankavli, Nilesh Rane is ahead among the Rane brothers)
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दीपक केसरकरांना धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे दिलीप ऊर्फ राजन गिरप विजयी झाले आहेत. एकूण २० जागांपैकी भाजप १६ जागांवर विजयी झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाने ३ जागा जिंकल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एवघ्या एका जागेवर विजय मिळवला आहे. त्याचवेळी सावंतवाडी नगरपरिषदेतही दीपक केसरकरांना धक्का दिला आहे. या नगरपरिषदेत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले नगराध्यपदी विजयी झाल्या आहेत. इथेही २० जागांपैकी भाजप ११ जागेवर विजयी झाला आहे. तर शिवसेनेला ७ जागांवर विजय मिळाला आहे. ठाकरे सेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे.मालवण नगरपरिषदेच्या २० पैकी १० जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. या नगरपरिषदेवर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्या आहेत. भाजपला सहा जागांवर तर ठाकरे गटाला ३ जागांवर विजय मिळाला आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. (In Kankavli, Nilesh Rane is ahead among the Rane brothers)