नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर शुक्रवारी पहाटे त्यांच्या मुळगावी मशहद हे दफन करण्यात आले. जवळपास आठवडाभर अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होती. देशभरातील विविध देशातील शिष्टमंडळे अत्यंसंस्कारास उपस्थित होते. भारताचे शिष्टमंडळही अंत्यविधीच्यावेळी उपस्थित होते. (Funeral of Ayatollah Khamenei)
अमेरिका आणि इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात २८ फेब्रुवारी रोजी अयातुल्ला खामेनी यांच्यासह इराणचे अनेक नेते, लष्करी अधिकारी बळी पडले होते. खामेनी यांनी इराणवर ३७ वर्षे राज्य केले. मशहदमध्ये दफन झालेले खामेनी हे दुसरे इराणी शासक होते. ११ वर्षे सत्तेवर राहिलेल्या नादेर शाह यांचे त्यांच्या हत्येनंतर याच शहरात दफन झाले होते. (Funeral of Ayatollah Khamenei)
गेल्या शनिवारी खामेनी यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली होती. अनेक शहरात त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. हजारो लोकांनी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत शोक व्यक्त केला होता. आज शुक्रवारी सकाळी खामेनी यांचे ज्येष्ठ पुत्र मुस्तफा यांनी अंत्यविधीची प्रार्थना केली. त्यांच्या चार मुलापैकी दुसरे पुत्र इराणचे सर्वोच्च नेते आणि त्यांचे उत्तराधिकारी मोजतबा खामेनी गैरहजर होते. इतर तीन मुले उपस्थित होते. (Funeral of Ayatollah Khamenei)
अंतिम बिदाईच्यावेळी दानेश चौक आणि इमाम रझा दर्गा येथे प्रचंड गर्दी जमल्याने खामेनी यांचे पार्थिव विमानाने पवित्र दर्ग्यात नेण्यात आले. मशहदमध्ये अंत्ययात्रा मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीत जमावाकडून ट्रम्पविरोधी फलक दाखवण्यात आले.