नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्ली आणि आसपासच्या परिसराला सोमवारी (१७ फेब्रुवारी) पहाटे ५.३६ च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. त्यामुळे नागरिकांत घबराट उडाली. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.० इतकी नोंदवली गेली. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. (Earthquake)
राष्ट्रीय भूकंपमापन केंद्रानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू धौला कुंआ येथील झील पार्क परिसरात पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली ५ किमी खोलीवर होता. केवळ पाच ते दहा किमी अंतरावर असलेल्या अशा भूकंपामुळे होणारे नुकसान जास्त असते, असे समजले जाते.
दिल्लीचा परिसर भूकंपांच्या दृष्टीने खूपच संवेदनशील आहे. हा परिसर देशातील भूकंपीयदृष्ट्या सक्रिय क्षेत्रांच्या झोन चारमध्ये येते. तो दुसऱ्या उच्च श्रेणीत मोडतो. गेल्या काही वर्षांत, या परिसराने अनेकदा ४ रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के अनुभवले आहेत. दिल्लीलगतच्या हरियाणात २०२२ मध्ये, ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मात्र तो हलक्या तीव्रतेचा होता. त्यामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. गेल्या १० वर्षांत दिल्ली परिसरात ५ रिश्टर स्केलचा भूकंप झालेला नाही, असे यूएस जिओलॉजिकल सर्वेचे आकडे सांगतात.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर सर्व यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी एक्सवर पोस्ट करत राजधानीतील सर्व नागरिक सुरक्षित असतील, अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत ११२ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
भूकंपाचे धक्के काही सेकंदांसाठीच जाणवले, मात्र त्यांच्या तीव्रतेमुळे नागरिकांची चिंता वाढली. लोकांना अचानक धक्का जाणवल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. त्वरित सुरक्षा उपाययोजनेचे प्रयत्न केले. इमारतींमधून बाहेर पडून अनेकजण सुरक्षित ठिकाणी थांबल्याचे चित्र होते.
दरम्यान, आतापर्यंत कोणतीही मोठी वित्त किंवा जीवितहानी नोंदवली गेली नसली तरी, संबंधित यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, यासंबंधीची अद्ययावत माहिती पुरवण्यात येईल, असे नागरिकांना आश्वस्त करण्यात आले आहे.
लोकांना शांत राहावे. आपत्कालीन परिस्थिती सुरक्षाविषयक उपायांचे पालन करावे, ‘संभाव्य धक्के’ लक्षात घेऊन जागरूक राहावे. सर्व संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
-पंतप्रधान नरेंद्र मोदी
EQ of M: 4.0, On: 17/02/2025 05:36:55 IST, Lat: 28.59 N, Long: 77.16 E, Depth: 5 Km, Location: New Delhi, Delhi.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/yG6inf3UnK
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 17, 2025
हेही वाचा :
अमेरिकेतून आणखी ११६ स्थलांतरीत भारतीयांना पाठवले
दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; १८ प्रवासी ठार