गोरखपूर : दारुड्या नवऱ्याचा सतत त्रास, शिविगाळ आणि मारझोड. दोघींच्या घरात हीच स्थिती. त्यामुळे या दोघी वैतागून गेल्या होत्या. मरण येत नाही म्हणून जगणं. शेवटी या दोघींनी असा निर्णय घेतला की, त्याने समाजालाच जोरदार चपराक दिली. (2 women tie knot)
या दोघींनी घरदार सोडले. देऊळ गाठले आणि त्या एकमेकीशी विवाहबद्ध झाल्या. कविता आणि गुंजा उर्फ बबलू अशी या दोघींची नावे आहेत. गुरुवारी त्यांनी निर्णय घेतला आणि देवरिया येथील छोटी काशी नावाच्या शिव मंदिरात त्यांनी लग्नगाठ बांधली.
माध्यमांशी बोलताना त्यांनी आतापर्यंत पतींकडून होत असलेल्या छळाचा पाढा वाचला. या दोघी इंस्टाग्रामवर एकमेकांशी कनेक्ट होत्या. दोघीही एकमेकीचे दु:ख शेअर करत असत. दोघींचे मद्यपी जोडीदार त्यांचा भयंकर छळ करत असत. समदु:खी असलेल्या दोघी भावनिकदृष्ट्या जवळ आल्या. शेवटी त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. पतीला सोडून त्या लग्नासाठी मंदिरात आल्या. गुंजाने वराची भूमिकेतून कविताच्या भांगात कुंकू भरला, एकमेकींनी हार घातला आणि अग्निसाक्षीने सात फेरे पूर्ण केले. 2 women tie knot
‘आम्ही आतापर्यंत खूप सहन केलं. आमच्या दारूड्या पतीकडून मार खाल्ला, त्याने दिलेली अपमानास्पद वागणूक सहन केली. खूप त्रास झाला. आता आम्हाला शांतपणे जगायचे आहे. त्यामुळे आम्ही दोघींनी हे सहजीवन स्वीकारले. आम्ही गोरखपूरमध्ये जोडपे म्हणून राहण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे गुंजाने सांगितले. 2 women tie knot
देवरिया
जनपद में समलैंगिक विवाह बना चर्चा का विषय
अपने-अपने शराबी पतियों से नाराज होकर दो महिलाओं ने की शादी
दोनों महिलाओं के पति शराब के हैं आदि
देवरिया जनपद के प्रतिष्ठित मंदिर में दोनों एक दूसरे के हुए
गोरखपुर जनपद की रहने वाली है दोनों महिलाएं
इंस्टाग्राम… pic.twitter.com/GHO1qFJQHh
— हिन्दी ख़बर | Hindi Khabar
(@HindiKhabar) January 23, 2025
हेही वाचा :