नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने ३२ वर्षीय हरीश राणा या तरुणाला इच्छामरणाची परवानगी देणारा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हरीश राणा गेल्या १३ वर्षापासून कोमामध्ये आहे. त्यांच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात इच्छामरणाची याचिका दाखल केली होती. इच्छामरणाची याचिका मान्य करण्याचा हा देशातील पहिला निर्णय आहे. न्यायमूर्ती जे.बी.पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. (Supreme Court allows euthanasia for young man)
हरीश राणा हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. २०१३ मध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन तो खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत हरीश राणा याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. हरीश कोमामध्ये गेले. गेले तेरा वर्षे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. हरीश पूर्णपणे बरा होण्याजी शक्यता मावळली असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. गेल्या तेरा वर्षापासून हरीशला जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांकडून गेली १३ वर्षे प्रयत्न करत आहेत. कुटुंबाची आर्थिक ओढाताण असतानाही त्यांनी प्रयत्न केले. उपचाराच्या खर्चासाठी राणा कुटुंबियांना खूप काटकसर करावी लागत होती. हरीशच्या उपचारासाठी त्यांनी घर विक्री केल्याचे सांगितले जाते. (Supreme Court allows euthanasia for young man)
हरीशच्या वडिलांनी मुलाच्या निष्क्रीय इच्छामरणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. निकाल देताना न्यायाधीश पारडीवाला खूप भाविनक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. या निर्णयात हरीश राणाला याला सुरू असलेले क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन (सीएएन) उपचार थांबवण्यास परवानगी दिली. ही प्रक्रिया मानवी पद्धतीने पार पाडायला हवी, असे न्यायालयाने म्हटले आहे. (Supreme Court allows euthanasia for young man)