Home » Blog » Firing at Yede Nipani : येडे निपाणी फाट्यावर गोळीबार ; एक जखमी

Firing at Yede Nipani : येडे निपाणी फाट्यावर गोळीबार ; एक जखमी

by प्रतिनिधी
0 comments
Firing at Yede Nipani

सांगली : प्रतिनिधी :  सांगली जिल्ह्यातील येडे निपाणी फाटयावर शनिवारी दुपारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अर्जुन शिवाजी थोरात (वय ५५ , रा. येडे निपाणी)  हे गंभीर जखमी झाले  असून त्यांना इस्लामपूर येथील खासगी हॉस्पिटल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील संशयित शिवाजी गणपती जाधव  आलगुडे  (वय ७०, रा. येडे निपाणी)  याने पिस्तूलातून गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Firing at Yede Nipani)

  जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.  जखमी अर्जुन थोरात आणि जखमी शिवाजी जाधव हे येडे निपाणीचे रहिवासी असून ते मित्र आहेत. आज दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पिस्तूलातून उडालेल्या  गोळ्या अर्जुन यांच्या पाठीत घुसल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. (Firing at Yede Nipani)

घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर उपविभागीय अधिकारी अरुण पाटील, सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तसेच कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  विक्रम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.  (Firing at Yede Nipani)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00