वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थे (नासा)ने आंतरराष्ट्रीय स्टेशन (आयएसएस) मधून सुनीता विल्यमस् अणि बैरी विल्मोर यांना परत आणणार असल्याचे सुतोवाच केले आहेत. ‘नासा’ने सांगितले आहे की, जेवढ्या लवकर आणता येईल त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बोइंग स्टार लाइनर कॅप्सूलमधील तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही अंतराळवीर गेले वर्षभर ‘आयएसएस’मध्ये आहेत. (sunita williams)
‘द हिंदू’च्या रिपोर्ट नुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघा अंतराळवीरांना ‘आयएसएस’ मधून परत आणण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यास एलन मस्क यांना सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे, ‘मी एलन मस्क आणि स्पेसएक्समधील दोन्ही बहाद्दूर आंतराळवीरांना परत आणण्यास सांगितले आहे. बायडन प्रशासनाने अंतराळात आहे त्या परिस्थितीत त्यांना सोडून दिले आहे. ते स्पेस स्टेशनवर अनेक महिने सुटकेसाठी वाट पहात आहेत. एलन मस्क त्यांना घेऊन येतील. मला आशा आहे की सर्व गोष्टी सुरळीत होतील’.(sunita williams)
मार्चच्या आधी होईल परतीचा प्रवास
सुनीता विल्यमस् आणि बुच विल्मोर यांची अंतराळाहून परतीचा प्रवास तांत्रिक कारणांमुळे अनेकदा टाळला गेला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोघे पृथ्वीवर परततील, असे यापूर्वीच सांगण्यात आले आहे. दोघांना स्पेस एक्स कॅप्सूलमधूल परत आणण्याची योजना आहे. ट्रम्प यांची सत्ता आल्याने जुन्या योजनेत बदलही होऊ शकतात. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात परत आणण्याच्या योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. (sunita williams)
हेही वाचा :