Home » Blog » Pope Francis died : पोप फ्रान्सिस यांचे निधन

Pope Francis died : पोप फ्रान्सिस यांचे निधन

८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

by प्रतिनिधी
0 comments
Pope Francis died

व्हॅटिकन सिटी : पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी (२१ एप्रिल) सकाळी ७:३५ वाजता निधन झाले. व्हॅटिकनने ही घोषणा केली. ते ८८ वर्षांचे होते. व्हॅटिकन चर्चचे कामकाज पाहणारे कॅमरलेंगो कार्डिनल केविन फॅरेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. (Pope Francis died)

‘‘आज सकाळी ७:३५ वाजता, रोमचे बिशप, फ्रान्सिस, पित्याच्या घरी परतले. त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रभूच्या आणि त्यांच्या चर्चच्या सेवेसाठी समर्पित होते,’’असे कार्डिनल फॅरेल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पोप फ्रान्सिस यांचा जन्म मूळचा अर्जेंटिनाचा. त्यांचे मूळ नाव जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ. पोपपदाची सूत्रे त्यांनी २०१३ मध्ये घेतली. ते पहिले जेसुइट पोप, अमेरिकेतील पहिले आणि व्हॅटिकनच्या १,२०० वर्षांहून अधिक वर्षाच्या काळातील त्यांनी पहिले गैर-युरोपीय पोप म्हणून इतिहास घडवला. त्यांच्या दशकभराच्या कारकीर्दीत दया, समावेशकता, नम्रता आणि पर्यावरण आणि उपेक्षित लोकांसाठी स्वत:ला देऊन त्यांनी कार्य केले. (Pope Francis died)

‘‘गॉस्पेलच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला विश्वासूपणा, धैर्य आणि वैश्विक प्रेम या मूल्यांची शिकवण दिली. विशेषतः सर्वांत गरीब आणि उपेक्षितांसाठी काम करण्याची शिकवण दिली,’’ असे फॅरेल यांनी म्हटले आहे.

पोप फ्रान्सिस यांना अलिकडच्या काळात श्वसनाच्या गुंतागुंतीने त्रस्त होते. त्यांच्यावर आतड्यांसंबंधी शस्त्रक्रिया करावी लागली होती. या परिस्थितीतही त्यांनी करुणेची कास धरत आणि सुधारणांवर लक्ष केंद्रित करत चर्चचे नेतृत्व केले होते. (Pope Francis died)

 “प्रभू येशूचा सच्चा शिष्य म्हणून त्यांच्याबद्दल आम्ही अपार कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या असीम, दयाळू प्रेमाचे कौतुक करतो,” असे फॅरेल म्हणाले.

पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या कार्यकाळात व्हॅटिकनमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यात आर्थिक पारदर्शकतेचा समावेश होता. त्यांनी पर्यावरणीय आणि हवामान बदलावर जागतिक कृती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा :

अमेरिकेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोटाळ्याची चर्चा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00