Home » Blog » Sunil Gujar : जवान सुनील गुजर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Sunil Gujar : जवान सुनील गुजर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अरुणाचल प्रदेशात वीरमरण

by प्रतिनिधी
0 comments
Soldier Gujar

कोल्हापूर : प्रतिनिधी: भारत चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेशात झालेल्या अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या जवान सुनील गुजर यांच्यावर शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथे शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील यांचे वडील विठ्ठल गुजर यांनी भडाग्नी दिला.  यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. (Sunil Gujar)

अरुणाचलम प्रदेशात भुसख्खलन झाले होते. त्यावेळी रस्त्यावरील दगड मातीचे ढिगारे डोझरद्वारे चालक सुनील गुजर हटवत होते. यावेळी डोझर घसरुन चारशे ते पाचशे फूट दरीत कोसळला आणि त्यामध्ये सुनील गुजर यांना वीरमरण आले. हे वृत्त कळताच शाहूवाडी तालुक्यातीवर शोककळा पसरली. आज सोमवारी सकाळी  कोल्हापूराहून त्यांचे पार्थिव शित्तूर गावाकडे रवाना झाले. बांबवडे बाजारपेठेसह परिसरातील गावांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन आदराजंली वाहिली. गुजर यांच्या अंत्यदर्शनासाठी बांबवडे पासून शित्तूर गावापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी गर्दी केली होती.(Sunil Gujar)

कोल्हापूर येथून पार्थिव शित्तूर येथे आणल्यावर उपस्थितांना अश्रू अनावर झाले. अंतिम दर्शन घेताना त्यांच्या पत्नी, आई, वडील आणि नातलगांनी हंबरडा फोडला. त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. पोलिस आणि सैन्य दलाच्यावतीने हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी ‘वीर जवान सुनील गुजर अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणा देण्यात आल्या.(Sunil Gujar)

यावेळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नयन कार्तिकेयन, प्रातांधिकारी समीर शिंगटे, पोलिस उप अधीक्षक अप्पासाहेब पवार, तहसिलदार रामलिंग चव्हाण, माजी आमदार सत्यजीत पाटील, मानसिंगराव गायकवाड, विजय बोरगे, धनंजय पाटील यांनी श्रद्धाजंली वाहिली. (Sunil Gujar)

हेही वाचा :

एकेरी उल्लेख नको; शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करा

औरंगजेबाचे महिमामंडन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00