Home » Blog » माजी फुटबॉलपटूची गळफास लावून आत्महत्या

माजी फुटबॉलपटूची गळफास लावून आत्महत्या

करवीर पोलिस स्टेशनमध्ये घटनेची नोंद

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur News

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक माजी फुटबॉल खेळाडूंने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे अद्याप कारण कळू शकले नाही. उमेश बबन भगत (वय ३८ रा. पाचगाव योगेश्वरी कॉलनी ) असे खेळाडूचे नाव आहे. सीपीआर पोलिस चौकीत गळफास लावून आत्महत्या अशी नोंद झाली आहे.

माजी फुटबॉल खेळाडू  उमेश भगत याने पाचगाव येथील राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी त्याचा गळफास सोडवून  सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

पाचगाव येथील उमेश भगत याने  जयभवानी स्पोर्टस् क्लब, शिवनेरी स्पोर्टस् फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाकडून प्रतिनिधीत्व केले आहे. सध्या तो खेळापासून जवळपास अलिप्त होता.  तो शिवाजी विद्यापीठाजवळील एनसीसी ऑफीसमध्ये सल्पाय करणाऱ्या कंपनीत काम करत होता असे कळते. तो पत्नी आणि दोन मुलींसह तो योगेश्वरी कॉलनीतील घरात राहत होता. सोमवारी सकाळी त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. मुलींना शाळेत सोडून आल्यानंतर भगत याने घरातील छताच्या हुकाला गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच शेजारी आणि नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या आत्महत्येची माहिती समजताच मित्र आणि फुटबॉल खेळाडूंनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली होती. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि वडील असा परिवार आहे.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00