Home » Blog » Shut up modi : संसदेत घुमणार ‘शट अप मोदी’ चा नारा

Shut up modi : संसदेत घुमणार ‘शट अप मोदी’ चा नारा

नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात डीएमके आक्रमक

by प्रतिनिधी
0 comments
Shut up modi


चेन्नई : नवीन शैक्षणिक धोरणावरुन (एनईपी) तामिळनाडूतील डीएमके सरकार आक्रमक झाले आहे. या सरकारने केंद्र सरकारशी दोन हात करायची तयारी केली आहे. नवीन शैक्षणिक धोरण राज्यात लागू करणार नाही, अशी ठाम भूमिका डीएमके सरकारने घेतली आहे. तसेच संसदेत याविरोधात ‘शट अप मोदी’ चा नारा देण्याचा इशाराही दिला आहे. (Shut up modi)
नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी केंद्र सरकार आणि डीएमके स्टॅलिन सरकार यांच्यात वाद सुरू आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यास डीएमकेने विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी तामिळनाडूत डीएमकेने ‘गो बॅक मोदी’ अभियान चालवले होते. आता डीएमकेचे खासदार ए.राजा यांनी एक पाऊल पुढे टाकत संसदेत ‘शट अप मोदी’ चा नारा घुमेल असा इशाराही दिला आहे. (Shut up modi)
चैन्नईमधील डीएमएके चे मुख्यालय अण्णा अरिवालयम येथे झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात खासदार ए.राजा म्हणाले, “तामिळ भाषेचा वापर करुन लोकांमध्ये फूट पाडण्याचा आरोप डीएमके करत आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मग मोदी भाषेच्या आधारावर लोकांमध्ये का फूट पाडत आहेत, असा आमचाही सवाल आहे. (Shut up modi)
ते म्हणाले, “पहिल्यांदा आम्ही“गो बॅक मोदी’ असे म्हटले होते. आमच्या उ मुख्यमंत्र्यांनी ‘गेट आऊट मोदी’ चा नारा दिला. आता या दोघांच्या पुढे एक पाऊल टाकत आम्ही संसदेत ‘शट अप मोदी’ असा नारा देणार आहोत. (Shut up modi)
मोदींविरोधात दिल्या होत्या घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी एआयएडीएमके सरकार असताना चेन्नईत आले होते तेव्हा ‘डीएमके’ने त्यांच्या विरोधात ‘गो बॅक मोदी’ च्या घोषणा दिल्या होता. तामिळनाडूला समग्र शिक्षा अभियान फंड अंतर्गत २१५१ कोटी रुपयाचा निधी दिला आहे असे भाजप केंद्र सरकारचे म्हणणे आहे. नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारल्यानंतर हा निधी दिला जाणार आहे. कल्याण योजनांमधील निधीही केंद्र सरकारने रोखून ठेवला आहे. तो द्यावा, अशी मागणी डीएमके सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून केली आहे. (Shut up modi)
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘गो बॅक मोदी’च्या घोषणेत बदल करुन आता ‘गेट आऊट मोदी’ घोषणा देण्यात येतील असा इशारा दिला होता. त्यावेळी ‘गेट आउट मोदी’ हा ट्रेंड सोशल मीडियावर केला होता. त्यावेळी भाजपचे तामिळनाडूतील प्रवक्ते ए.एन.एस प्रसाद यांनी मोदींविरोधात घोषणा दिल्याबद्दल तामिळनाडूतील डीएमके सरकार बरखास्त करा अशी मागणी केली होती. प्रसाद यांनी आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात देणाऱ्या घोषणेबददल काहीच बोलत नाही, असा अर्थ डीएमके सरकारने घेऊ नये. डीएमके नेत्यांनी आपले वर्तन सुधारावे अन्यथा तुम्हाला सुधारावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तामिळनाडू जबरदस्त सरकार परिवर्तनाकडे तुम्ही ढकलू देऊ नका असा इशाराही दिला आहे. (Shut up modi)
डीएमके आणि भाजपमध्ये का आहे विरोध
राजकीय कुरघोड्यावरुन भाजप आणि डीएमकेमध्ये विरोध सुरू आहे. तामिळ भाषा आणि संस्कृती रक्षणावरुन डीएमके भाजपवर टीका करत आहे. तर भाजप डीएमकेवर तृष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत आहे. ‘शट अप मोदी’ अशा घोषणा संसदेत डीएमके देणार का यावर राजकारण जोरात तापणार आहे. (Shut up modi)


हेही वाचा :

शक्तिकांत दास मोदींचे प्रधान सचिव

माझा जन्म जैविक नाही म्हणतो त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00