चेन्नई : मक्कल नीधी मय्यम पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी तामिळनाडूतून राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. द्रमुकने त्यांना यापूर्वी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. द्रमुकने कमल हसन यांच्या पक्षाला राज्यसभेची एक जागा दिली आहे. (Kamal Hasan’s nomination)
कमल हासन यांनी शुक्रवारी (६ जून) चेन्नई येथील तमिळनाडू सचिवालयात मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
द्रमुकचे मित्रपक्ष – व्हीसीके नेते थिरुमावलावन, एमडीएमके नेते वायको आणि तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के. सेल्वापेरुंदगई हेही यावेळी उपस्थित होते.
द्रमुकने मक्कल नीधी मय्यमला राज्यसभेची एक जागा दिल्याने, त्यांचे संस्थापक आणि अभिनेते कमल हासन यांना आधी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. (Kamal Hasan’s nomination)
२३४ सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान ३४ मते आवश्यक आहेत. १५८ आमदारांसह (द्रमुक: १३३, काँग्रेस: १७, व्हीसीके: ४, सीपीआय: २, सीपीएम: २) द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया गट चार जागा आरामात जिंकण्याची शक्यता आहे.
कवयित्री सलमा यांना द्रमुकची उमेदवारी
सत्ताधारी द्रमुकने या वर्षी १९ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी कवयित्री सलमा, विद्यमान राज्यसभा खासदार आणि वकील पी. विल्सन आणि एस.आर. शिवलिंगम यांना उमेदवारी दिली होती.
अभिनेता कमल हासन यांनी २०१८ मध्ये मदुराई येथे पक्षाची स्थापना केली. एमएनएमने २०२४ च्या लोकसभा निवडणूक लढवली नाही. त्याऐवजी राज्यात द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकसाठी प्रचार केला. त्या बदल्यात द्रमुकने पक्षाला राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन दिले होते. २०२१ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत एमएनएमने २.६२% मते मिळवली होती.
ठग लाईफ रिलीज
गुरुवारी (५ जून) रोजी, कमल हसन यांचा नवीन चित्रपट ठग लाईफ मोठ्या उत्साहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे. मणिरत्नम आणि हासन ३८ वर्षांनी यानिमित्ताने एकत्र आले आहेत.
हेही वाचा :
जगातील सर्वांत उंच पुलाचे उद्घाटन
रेपो दरात ५० पॉईंटची घसघशीत कपात