Home » Blog » Sayaji Shinde’s anger over tree cutting : नाशिक तपोवनातील वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंचा संताप

Sayaji Shinde’s anger over tree cutting : नाशिक तपोवनातील वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंचा संताप

by प्रतिनिधी
0 comments
Sayaji Shinde's anger over tree cutting

नाशिक : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन येथे साधुग्राम उभारणीसाठी शेकडो झाडे कापण्यात येणार आहेत. त्याविरोधात नाशिककर पर्यावरणप्रेमी एकवटले असून त्यांच्या आंदोलनाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. या वृक्षतोडीवर सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. गतवर्षी सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी वृक्षतोडीवर टीका करत महायुतीच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. (Sayaji Shinde’s anger over tree cutting)

वृक्षतोडीचे प्रकरणे चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. ” तपोवनमधील वृक्षतोड ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, मला नाशिकमधून फोन येत आहेत, एक झाड तोडलं तर आम्ही शंभर लोक मरायला तयार आहोत, झाड तोडून दाखवा,” असा थेट इशाराच त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे. (Sayaji Shinde’s anger over tree cutting)

“शंभर जणांचे बलिदान देऊ मात्र नाशिकमधील एकही झाड तोडू देणार नाही. माणसे पेटून उठतील. मी फक्त निमित्त असेन. तपोवन येथील कुंभमेळ्यासाठी झाडे जोडणे दुर्दैवी आहे. खूप विरोध करावा लागेल. झाड तोडून १० झाडे लावू हे विधान फालतू आहे. सरकार आपले असूनही बेजबाबदारपणे वागत आहे. खरे तर माझ्या तोंडात शिव्या येत आहेत. माझ्या डोळ्यादेखत मुले मारावी तशी झाडे तोडली जात आहेत. हे आपण वाचवलच पाहिजे.” असे सयाजी शिंदे यावेळी म्हणाले. (Sayaji Shinde’s anger over tree cutting)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00