Home » Blog » Shinde threatened: एकनाथ शिंदेंना धमकी

Shinde threatened: एकनाथ शिंदेंना धमकी

कार उडवण्याचा मुंबई पोलिसांना ई मेल

by प्रतिनिधी
0 comments
Shinde threatened

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राजकीय नेते आणि आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्याने शिवसेनेत नाराजी व्यक्त होत असताना त्यांचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव व जेजे मार्ग पोलिसांना ईमेल द्वारे पाठवण्यात आली आहे. पोलीस या संशयिताचा शोध घेत आहेत. खोडसाळपणे हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Shinde threatened)

हिंदीमध्ये आलेल्या या ई-मेलमध्ये एकनाथ शिंदेंची कार बॉम्बने उडवून देणार आहे. माझी ताकद किती मोठी आहे हे तुम्हाला माहित नाही, असे म्हटले आहे. धमकी दिल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांपासून निनावी फोन आणि धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. (Shinde threatened)

तसेच हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागे कोणाचा हात आहे, याची चौकशी सुरु आहे. राज्य सरकारने नुकतेच राजकीय नेते आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांना यापूर्वी पुरवण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांत नाराजी व्यक्त होत आहेत या धमकीमागे ते कारण असू शकते का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

मोदी सरकारचे प्राधान्य पीआर स्टंटला, राष्ट्रीय सुरक्षेला नाही

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकपाल कक्षेत नाहीत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00