Home » Blog » JD Vance : आम्हाला यात पडायचे नाही

JD Vance : आम्हाला यात पडायचे नाही

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची भूमिका

0 comments
JD Vance

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने दहशवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या हद्दीत जाऊन धडा शिकवला. पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्ताननेही जम्मू काश्मिरच्या सीमावर्ती भागात क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला. मात्र ती सर्व भारतीय लष्कराने निकामी केली. (JD Vance)

दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या अमेरिकेने आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केली आहे. ‘‘आम्ही भारताला शस्त्रे खाली ठेवायला सांगू शकत नाही. आम्हाला यामध्ये पडायचे नाही,’’ अशी नि:संदिग्ध भूमिका अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी मांडली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’बाबत फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्हान्स म्हणाले, “आपण लोकांना केवळ तणाव कमी करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु आम्ही अशा युद्धात अडकणार नाही. ते मुळात आपले काम नाही. त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अमेरिकेचा काहीही संबंध नाही.” (JD Vance)

‘‘अमेरिका भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही आणि पाकिस्तानलाही शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. आणि म्हणून, आम्ही राजनैतिक माध्यमांद्वारे या गोष्टीचा पाठपुरावा करत राहू. या व्यापक प्रादेशिक युद्धाचे आण्विक संघर्षात रूपांतर होणार नाही. आम्हाला या गोष्टींबद्दल काळजी आहे. असे घडले तर ते विनाशकारी होईल. परंतु असे काही घडेल असे सध्या आम्हाला वाटत नाही,”  असेही जेडी व्हान्स म्हणाले.

ट्रम्प यांची भूमिका

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, भारत आणि पाकिस्तानदरम्यान काय सुरू आहे त्याची जाणीव आहे. दोन्ही देशांनी आता शांततेचा मार्ग स्वीकारावा अशी त्यांची इच्छा आहे. माझी काही मदत लागली तर मी त्यासाठी उपलब्ध असेन, असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान बिथरला

भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानने गुरुवारी (८ मे) रात्री जम्मूच्या सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया शहरांवर आठ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ही सर्व क्षेपणास्त्रे भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने निकामी केली. (JD Vance) दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. त्याला भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिले आहे. काल रात्री पाकिस्तानने भारतीय शहरांना लक्ष्य करत हल्ले केल्याचे प्रयत्न केल्यानंतर दोन्ही देशामध्ये तणाव वाढला आहे.

हेही वाचा :
बीएसएफकडून सात दहशतवादी यमसदनी
द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00