Home » Blog » Series Win : भारताचा इंग्लंडला ‘व्हाइटवॉश’

Series Win : भारताचा इंग्लंडला ‘व्हाइटवॉश’

तिसऱ्या वन-डेतील विजयासह मालिका ३-० ने जिंकली

by प्रतिनिधी
0 comments
Series Win

अहमदाबाद : फलंदाजांच्या कामगिरीला गोलंदाजांची तोलामोलाची साथ लाभल्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरा वन-डे सामना १४२ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. भारताच्या ३५६ धावांसमोर इंग्लंडचा डाव पस्तिसाव्या षटकात २१४ धावांत आटोपला. (Series Win)

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि बेन डकेट या जोडीने इंग्लंडला पहिल्या सहा षटकांमध्येच ६० धावांची सलामी दिली होती. अर्शदीपने या दोघांनाही बाद करून इंग्लंडच्या धावसंख्येला ब्रेक लावला. त्यानंतर ठरावीक अंतराने इंग्लंडचे फलंदाज बाद होत राहिले. तळातील गस ॲटकिन्सच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडला २०० धावांचा टप्पा तरी ओलांडता आला. ॲटकिन्सनने १९ चेंडूंमध्ये ६ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा फटकावल्या. पस्तिसाव्या षटकात अक्षरने त्याचा त्रिफळा उडवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (Series Win)

तत्पूर्वी, शुभमन गिलचे शतक व विराट कोहली, श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना ३५६ धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्याच षटकात कर्णधार रोहित शर्मा केवळ एक धाव करून बाद झाल्यानंतर शुभमनने प्रथम विराट आणि नंतर अय्यरसोबत शतकी भागीदारी रचली. शुभमनने वन-डे कारकिर्दीतील सातवे शतक झळकावताना १०२ चेंडूंमध्ये १४ चौकार व ३ षटकारांसह ११२ धावा केल्या. विराटने ५५ चेंडूंमध्ये ७ चौकार, एका षटकारासह ५२, तर अय्यरने ६४ चेंडूंत ८ चौकार, २ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. (Series Win)

धावफलक : भारत – रोहित शर्मा झे. सॉल्ट गो. वूड १, शुभमन गिल त्रि. गो. रशीद ११२, विराट कोहली झे. सॉल्ट गो. रशीद ५२, श्रेयस अय्यर झे. सॉल्ट गो. रशीद ७८, लोकेश राहुल पायचीत गो. महमूद ४०, हार्दिक पंड्या त्रि. गो. रशीद १७, अक्षर पटेल झे. बँटन गो. रूट १३, वॉशिंग्टन सुंदर झे. ब्रुक गो. वूड १४, हर्षित राणा झे. बटलर गो. ॲटकिन्सन १३, अर्शदीप सिंग धावबाद २, कुलदीप यादव नाबाद १, अवांतर १३, एकूण ५० षटकांत सर्वबाद ३५६.

बाद क्रम १-६, २-१२२, ३-२२६, ४-२५९, ५-२८९, ६-३०७, ७-३३३, ८-३५३, ९-३५३, १०-३५६.

गोलंदाजी साकिब महमूद १०-०-६८-१, मार्क वूड ९-१-४५-२, गस ॲटकिन्सन ८-०-७४-१, जो रूट ५-०-४७-१, आदिल रशीद १०-०-६४-४, लियाम लिव्हिंगस्टन ८-०-५७-०.

इंग्लंड फिल सॉल्ट झे. पटेल गो. अर्शदीप २३, बेन डकेट झे. रोहित गो. अर्शदीप ३४, टॉम बँटन झे. राहुल गो. कुलदीप ३८, जो रूट त्रि. गो. पटेल २४, हॅरी ब्रुक त्रि. गो. राणा १९, जोस बटलर त्रि. गो. राणा ६, लिव्हिंगस्टन यष्टि. राहुल गो. सुंदर ९, ॲटकिन्सन त्रि. गो. पटेल ३८, राशीद त्रि. गो. पंड्या ०, वूड झे. अय्यर गो. पंड्या ९, महमूद नाबाद २, अवांतर १२, एकूण ३४.२ षटकांत सर्वबाद २१४.

बाद क्रम १-६०, २-८०, ३-१२६, ४-१३४, ५-१५४, ६-१६१, ७-१७४, ८-१७५, ९-१९३, १०-२१४.

गोलंदाजी अर्शदीप ५-०-३३-२, हर्षित ५-१-३१-२, वॉशिंग्टन ५-०-४३-१, अक्षर ६.२-१-२२-२, हार्दिक ५-०-३८-२, कुलदीप ८-०-३८-१.

हेही वाचा :

श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर विजय
केरळ नाट्यमरीत्या उपांत्य फेरीत
भारताची मकाऊवर
बुमराह ‘आउट’, चक्रवर्ती ‘इन’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00