मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअरबाजारात उमटले. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरील नवीन टॅरिफची अंमलबजावणी एका महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारयुद्धाची भीती कमी झाली. जागतिक बाजारातील नफ्याचा मागोवा घेत देशांतर्गत शेअर बाजार मंगळवारी १.६ टक्क्यांहून अधिक वाढले. सेन्सेक्सने १,४७१.८५ अंकांची उसळी घेतली, तर निफ्टी ४०१.७ अंकांनी वधारला. (sensex surges)
सेन्सेक्स १..८१ टक्क्यांनी म्हणजेच १,३९७.०७ अंकांनी वाढून ७८,५८३.८१ वर गेला. निफ्टी ५०१.६२ टक्क्यांनी म्हणजेच ३७८.१६ अंकांनी २३,७३९.२५ वर बंद झाला. इंट्रा-डे व्यवहारात, सेन्सेक्सने १,४७१.८५ अंकांची उसळी घेतली, तर निफ्टी ४०१.७ अंकांनी वधारला. (sensex surges)
भारत सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाला होता. मात्र ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिको आणि चीनवर आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवले. त्यामुळे अर्थसंकल्पात मिळालेला दिलासा फार काळ टिकला नाही. ट्रम्प यांच्या व्यापारयुद्ध धोरण नीतीमुळे जागतिक बाजारपेठेवर विपरीत परिणाम दिसून आले. त्याचा फटका भारतीय शेअरबाजारावरही झाला.
कमकुवत जागतिक बाजारपेठेत भारताची कामगिरी मागे पडू शकते. मात्र जागतिक बाजारात तेजी आल्याने देशांतर्गत समभागांमध्ये मोठी वाढ झाली आहे, असे जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. (sensex surges)
बाजारात अल्पावधीत चांगली तेजी येण्याची शक्यता LKP सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे यांनी वर्तवली.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के आणि चीनवर १० टक्के शुल्क लागू करण्याच्या घोषणा केली आहे. त्यामुळे सोमवारी बाजारात विक्रीचा सपाटा झाला. आता कॅनडा आणि मेक्सिकोवरील वाढीव शुल्क अंमलबजावणी एका महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.
एकूण बाजारातील वातावरण सकारात्मक राहिले तरी लार्ज कॅप समभागांना प्राधान्य दिले गेले, असे नायर म्हणाले. बीएसईचा लार्जकॅप निर्देशांक मंगळवारी १.६२ टक्क्यांनी वाढला. (sensex surges)
राष्ट्रीय शेअर निर्देशांकांमध्ये श्रीराम फायनान्स लिमिटेड (५.६५ टक्के), लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (४.१९ टक्के), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (३.६८ टक्के), इंडसइंड बँक (३.६८ टक्के) आणि अदानी पोर्ट्स (३.५४ टक्के) यांचे भाव वाढल्याचे दिसून आले.
हेही वाचा :