बेतीया: रात्रीचे दहा वाजता पोलिस लाईनमध्ये सामसूम होती. बहुतांशी पोलिस कर्मचारी आराम करत होते. अचानक बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकायला मिळाला. एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या पोलिस सहकाऱ्यांवर धडाधड बंदुकीतून ११ गोळ्या झाडल्या. पोलिस ठाण्यात गोंधळ उडाला. सहकाऱ्याची हत्या केल्यानंतर पोलिस कर्मचारी पोलिस लाईनच्या छतावर चढला. त्यामुळे पोलिस लाईनच्या आवारात दहशत माजली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार करणाऱ्या पोलिसाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. पण ११ गोळ्या झाडल्याने पोलिस जागेवरच ठार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याचा मृतदेह पाहून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा थरकाप उडाला होता. (Police firing)
बिहारमधील चंपारण्य पश्चिम मधील बेतिया पोलिस लाईनमध्ये शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या समारास ही घटना घडली. पोलिस ठाण्यात बंदोबस्तास असलेल्या शिपाई सर्वजीतने आपल्या रायफलमधून त्याचा सहकारी पोलिस शिपाई सोनू कुमारवर ११ गोळ्या झाडल्या. घटनास्थळीच सोनूचा मृत्यू झाला. ज्यावेळी घटना घडली तेव्हा बहुतांशी पोलिस विश्राती घेत होते. अचानक गोळ्यांचा आवाज ऐकू लागला. पोलिस लाईनमध्ये अफरातफरी माजली. गोळीबारानंतर शिपाई सर्वजीत आपली रायफल घेऊन पोलिस लाईनच्या छतावर चढाला. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये दहशत माजली. (Police firing)
छतावर रायफल दाखवून सर्वजीत धमकावत होता. तो शरण येण्यास तयार नव्हता. त्याला शरण आणण्यासाठी पोलिसांना खूप परिश्रम करावे लागले. अखेर तो छतावरुन उतरला. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. एसडीओपी विवेक दीप त्याची चौकशी करत आहेत. (Police firing)
घटनेची माहिती मिळताच चंपारण रेंचेचे डीआयजी हरकिशोर राय पोलिस लाईनमध्ये पोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. ही अतिशय दुर्दवी आणि गंभीर घटना असल्याचे डीआयजी राय म्हणाले. प्राथमिक माहितीनुसार दोघांमध्ये वाद होता. तरीही प्रत्येक पैलू आम्ही तपासून पहात आहोत. आरोपीला अटक केली असून फॉरेन्सिक टीम तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. (Police firing)
हेही वाचा :
पुणे भूमिअभिलेख’च्या दोघा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
देशातील यादवीला सरन्यायाधीश खन्ना जबाबदार