Home » Blog » Satwik-Chirag : सात्विक-चिराग यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Satwik-Chirag : सात्विक-चिराग यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

by प्रतिनिधी
0 comments
Satwik-Chirag

जकार्ता : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या अन्य खेळाडूंना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. (Satwik-Chirag)

सात्विक-चिराग जोडीने दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या रॅस्मस केजर-फ्रेडरिक सोगार्ड या जोडीला १६-२१, २१-१८, २२-२० असे पराभूत केले. भारतीय जोडीने १ तास ८ मिनिटांमध्ये हा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक-चिराग यांनी लागोपाठ दोन गेम जिंकत विजय निश्चित केला. उपांत्यपूर्व फेरीत सात्विक-चिराग जोडीचा सामना मलेशियाच्या सातव्या मानांकि वेई चाँग मान-काई वून ती या जोडीशी होईल. महिला एकेरीत पीव्ही सिंधूला दुसऱ्या फेरीत थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवाँगने २२-२०, १०-२१, १८-२१ असे हरवले. सिंधूने या सामन्यात सव्वा तासापेक्षा अधिककाळ झुंज दिली. सामन्यातील पहिला गेम जिंकून तिने आघाडीही घेतली होती. मात्र पुढील दोन गेममध्ये तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. (Satwik-Chirag)

महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत युकी फुकुशिमा-मायू मात्सुमोतो या जोडीने भारताच्या ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद यांना २१-१३, २४-२२ असे नमवले. हा सामना जपानच्या जोडीने ४६ मिनिटांत जिंकला. मिश्र दुहेरीमध्येही सतीशकुमार करुणाकरन-आद्या वारियाथ ही भारतीय जोडी दुसऱ्या फेरीमध्ये पराभूत झाली. थायलंडच्या देचापॉल पुवारानुक्रोह-सुपिसारा पेवसाम्प्रान या सहाव्या मानांकिन जोडीने सतीश-आद्या यांचा अवघ्या २५ मिनिटांमध्ये २१-७, २१-१२ असा पराभव केला. (Satwik-Chirag)

हेही वाचा :
चेंगराचेंगरीप्रकरणी ‘आरसीबी’वर गुन्हा
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00