पुणे : प्रतिनिधी : वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी महत्वाची समजल्या जाणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी सीबीआयच्या गळाला मोठा मासा लागला आहे. महाराष्ट्रात प्रचंड जाहीरातबाजी करणाऱ्या रेणकाई करियर सेंटर म्हणजेच आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली आहे. मोटेगावकराच्या अटकेनंतर खळबळ उडाली आहे. त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता नऊ दिवस सीबीआय पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (CBI detains Motegaonkar in connection with the NEET case)
गेल्या काही वर्षापासून लातूर येथे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग क्लासेसची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे मोटेगावकरांचे क्लास केवळ लातूर जिल्ह्यापुरतेच मर्यादीत नसून त्यांच्या क्लासेसच्या शाखा पुणे, पिंपरी, हडपसर, नाशिक, नांदेड, अकोला, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी आहेत. आता प्रा. शिवराज मोटेगावरकरांकडे सीबीआरने नजर वळवली आहे. रविवारी त्यांची सीबीआयने जवळजवळ ११ तास चौकशी केली आहे. आज सोमवारी त्यांना ताब्यात घेतले. (CBI detains Motegaonkar in connection with the NEET case)
नीट पेपरफुटीप्रकरणी मोटेगावकर यांची काय लिंक आहे हे समजणार आहे. मोटेगावकरांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजार केले जाणार आहे अशी माहिती पुढे आली आहे. नीट पेपरफुटीचे धागेदोरे राजस्थान,हरियाणा आणि महाराष्ट्रात पसरले आहेत. आत्तापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. या पेपरफुटीचा मुख्य सुत्रधार लातूरच्या दयानंद महाविद्यालयातील रसायनशास्त्राचा प्रा. पी.व्ही.कुलकर्णी याला शुक्रवारी अटक केली. त्यानंतर शनिवारी पुण्यातील एका नामांकित कॉलेजच्या जीवशास्त्राच्या प्राध्यापक मनिषा गुरुनाथ मांढरे यांना अटक झाली आहे. या दोन संशयितानंतर आता मोटेगावकरांना ताब्यात घेतले आहे. मोटेगावकरांचा कुलकर्णी आणि मांढरे यांच्याशी काही संबध आहेत का? याचा तपास सीबीआय करणार आहे. (CBI detains Motegaonkar in connection with the NEET case)