Home » Blog » Ravindra Jadeja : जडेजाचा अनोखा विक्रम

Ravindra Jadeja : जडेजाचा अनोखा विक्रम

तब्बल १,१५१ दिवस कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत अग्रस्थानी

by प्रतिनिधी
0 comments
Ravindra Jadeja

दुबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीतील अग्रस्थान टिकवून ठेवले आहे. याबरोबरच, त्याने सर्वाधिक काळ अग्रस्थानावर असणाऱ्या खेळाडूचा नवा विक्रमही प्रस्थापित केला. जडेजा तब्बल १,१५१ दिवस या क्रमवारीत अग्रस्थानावर आहे. (Ravindra Jadeja)

जडेजाच्या खात्यात ४०० गुण आहेत. मागील चार महिने जडेजाने एकही कसोटी सामना खेळला नसतानाही, त्याच्या अग्रस्थानाला कोणताही धक्का लागलेला नाही. २०२२ मध्ये वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकत जडेजाने अष्टपैलूंच्या क्रमवारीत अग्रस्थान मिळवले होते. तेव्हापासून त्याचे अव्वलस्थान अबाधित आहे. जडेजाखालोखाल बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझने ३२७ गुणांसह दुसरे स्थान फटकावले आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत प्रभावी कामगिरी केल्यामुळे मिराझचे या क्रमवारीतील स्थान एकने सुधारले. या मालिकेत त्याने ११६ धावा करण्याबरोबरच १५ विकेटही घेतल्या. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सनला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले. यान्सन २९४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स २७१ गुणांसह चौथ्या, तर बांगलादेशचा शाकिब अल हसन २५३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. (Ravindra Jadeja)

मेहदी आयसीसीचाप्लेयर ऑफ दि मंथ

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराझची आयसीसीतर्फे एप्रिल महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. आयपीएल सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात खूप कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात आले. त्यापैकी झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या कसोटी मालिकेत मिराझने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये छाप पाडली. मिराझ हा आयसीसीचा ‘प्लेयर ऑफ दि मंथ’ पुरस्कार पटकावणारा बांगलादेशचा केवळ तिसरा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी, शाकिब-अल-हसन आणि मुश्फिकूर रहीम या क्रिकेटपटूंची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00