महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रतन टाटा यांची प्रकृती गंभीर असल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. सोमवारीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Ratan Tata Health Update )
तथापि, काही तासांनंतर, रतन टाटा यांनी एका निवेदनात सांगितले की त्यांचे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे त्यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीबाबत ही बातमी समोर येत आहे. रतन टाटा म्हणाले होते की, माझ्या प्रकृतीची काळजी करण्यासारखे काही नाही. वयाशी संबंधित आजारांसाठी चाचणी केली जात आहे. ते म्हणाले होते की, माझ्या वयाशी संबंधित आजारांमुळे माझी सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मी पूर्णपणे निरोगी आहे. त्यामुळे लोकांनी अफवा पसरवू नयेत असे आवाहन त्यांनी केले.
Thank you for thinking of me 🤍 pic.twitter.com/MICi6zVH99
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 7, 2024
हेही वाचा :
- जे करायला विराटने सहा वर्षे लावली, तेच रूटने आठ महिन्यात केलं!
- महाराष्ट्र महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी कोल्हापूरच्या आर्या मोरेची निवड
- आजपासून पावसाचा जोर वाढणार