Home » Blog » Chandrakant patil : परराज्यातील नागरिकांना मातृभाषेतून शिकण्याचा हक्क

Chandrakant patil : परराज्यातील नागरिकांना मातृभाषेतून शिकण्याचा हक्क

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

by प्रतिनिधी
0 comments
Chandrakant patil

कोल्हापूर : प्रतिनिधी  : कोल्हापूर परिसरात सिंधी, गुजराती, राजस्थानी बांधवही कामानिमित्ताने स्थायिक झाले आहेत. आपण मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरीत असताना त्यांनाही त्यांच्या मातृभाषेतून शिकण्याचा हक्क प्रदान केला पाहिजे. त्या दृष्टीने सुरवातीला या भाषांतील ३ महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करावेत, जेणे करून या बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मातृभाषा शिक्षण घेता येऊ शकेल. शिवाजी विद्यापीठाने या शिवाजी विद्यापीठाने या भाषांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने तसा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना केली. (Chandrakant patil)

शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम परिसरांना कायमस्वरुपी जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यांची पूर्तता करून त्यांचे सशक्तीकरण करण्याबाबत राज्य शासन गांभीर्याने काम करीत आहे, असेही यांनी सांगितले. मंत्री पाटील म्हणाले, विद्यापीठांना पायाभूत सुविधा पुरवून त्या अनुषंगाने त्यांचे सक्षमीकरण जितके आवश्यक आहे, तितकेच त्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यापीठांनी देशविदेशांतील विविध विषयांतील तज्ज्ञ प्राध्यापकांना ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस’ म्हणून आमंत्रित करून त्यांच्याकडील ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. (Chandrakant patil)

मंत्री  पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या ‘कमवा व शिका’ योजनेचे अधिक सशक्तीकरण करावे, अशी सूचना केली. ते म्हणाले, सध्या या योजनेअंतर्गत काम करीत असणाऱ्या विद्यार्थिनींचे कामाचे तास आणि त्यासाठी त्यांना देण्यात येणारे शुल्कही वाढवावे. यासाठी काही खाजगी उद्योगांकडून सामाजिक दायित्व निधी मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करू, जेणे करून योजनेतून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त साधारण अडीच हजार रुपयांचा अधिकचा निधी संबंधित विद्यार्थिनींना मिळून त्यांचे सक्षमीकरण होईल, असे ते म्हणाले. (Chandrakant patil)

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास गेले, असे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सांगितले. (Chandrakant patil)

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन, इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, राष्ट्रीय येवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, राहुल चिकोडे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. व्ही.एम. पाटील, स्वागत परुळेकर यांच्यासह बांधकाम समितीचे सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुयारी मार्गाचे काम एक वर्षात पूर्ण

गत वर्षी ३ फेब्रुवारीला भुयारी मार्गाच्या कामाचे भूमीपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. यानंतर वर्षभराच्या अवधीत हे काम पूर्णत्वास गेले आहे. यामध्ये विद्यापीठ परिसराच्या पूर्व व पश्चिम बाजूचे जोड रस्ते व सेवा मार्ग आणि भुयारी मार्ग यांचा समावेश आहे. पश्चिम बाजूकडील जोड रस्त्याची लांबी १६६ मीटर इतकी तर पूर्व बाजूकडील जोड रस्त्याची लांबी २९.३२ मीटर इतकी आहे. भुयारी मार्गाची लांबी ३१.३२ मीटर असून रुंदी ८.५० मीटर आणि उंची ३ मीटर आहे. भुयारी मार्गातील वाहनमार्ग ५.५० मीटर इतका असून दोहो बाजूला १.२५ मीटरचा पदपथ आहे. पूर्व बाजूस महामार्गावरुन खाली उतरण्यासाठी जिना, पश्चिम बाजूकडील जोड रस्त्यासाठी रिटेनिंग भिंत आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आर.सी.सी. गटर आदी कामेही या अंतर्गत करण्यात आली आहेत.

हेही वाचा :

खासबाग सांस्कृतिक संकुलसाठी दहा कोटी
 प्रा. डॉ. प्रकाश पवार, एकनाथ पाटील यांना राज्य वाङ्मय पुरस्कार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00