मुंबई : प्रतिनिधी : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला असल्याचे खात्रीशीर सूत्राकडून समजते. नवीन नियुक्ती होईपर्यंत त्यांना पदभार सांभाळण्यास सांगण्यात आले आहे. (Rashmi Shukla resigns)
दरम्यान, नवीन पोलीस महासंचालक पदासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर व राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) महासंचालक सदानंद दाते यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
रश्मी शुक्ला या दोन टप्प्यात गेल्या वर्षभरापासून राज्याचे पोलीस प्रमुखपद सांभाळत आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षाने केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना या पदावरून हटविले होते. निवडणुकीत महायुती सरकार पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानंतर डिसेंबर महिन्यात त्यांनी पुन्हा पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षाच्या जानेवारीपर्यंत आहे. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. (Rashmi Shukla resigns)
शुक्ला यांच्यानंतर सेवाजेष्ठतेनुसार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे सर्वांत ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांची सेवानिवृत्ती ३० एप्रिल महिन्यात आहे. त्यामुळे त्यांना डीजीपी केल्यास पुन्हा मुदतवाढ दिली जाईल. त्यांच्यासह एनआयएचे प्रमुख सदानंद दाते यांच्या नावही चर्चेत आहे. मात्र ते मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी असल्याचे समजते. (Rashmi Shukla resigns)
१९८८ च्या बॅचच्या आयपीएस आसलेल्या रश्मी शुक्ला वयोमानानुसार गेल्यावर्षी ३० जूनला सेवानिवृत्त होणार होत्या. मात्र राज्य सरकारने त्यांची गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांची डीजीपी पदावर नियुक्ती केली. पुढील दोन वर्षासाठीचा कार्यकाळ निश्चित केला होता, मात्र प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी राजीनामा देण्याचे निश्चित केले असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा :