Home » Blog » RangBahar Maifal : रंगबहार मैफल रविवारी

RangBahar Maifal : रंगबहार मैफल रविवारी

श्रीकांत डिग्रजकर यांचा ‘जीवनगौरव’ने सन्मान

by प्रतिनिधी
0 comments
RangBahar Maifal

कोल्हापूर : ‘रंगबहार’च्या वतीने कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘मैफल रंगसुरांची’ हा कार्यक्रम रविवारी (दि. १९ जानेवारी) हाेणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान टाऊन हॉल बाग, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. (RangBahar Maifal)

याप्रसंगी श्यामकान्त जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ कला संघटक श्रीकांत डिग्रजकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा हा १२ वा जीवन गौरव पुरस्कार आहे.
यापूर्वी चित्रकार व्ही. ए. माळी, बी. आर. टोपकर, विजयमाला मेस्त्री (पेंटर घराणे), शी. द. फडणीस, दि. वी. वडणगेकर, विश्रांत पोवार, निर्मला कुलकर्णी, डॉ. नलिनी भागवत, प्रकाश राजेशिर्के, जी. एस. माजगावकर आणि विलास बकरे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच यावर्षीचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालिया, सचिन सूर्यवंशी कोल्हापूरचे युवा युटूबर यश दरेकर यांचाही गौरव यावेळी होणार आहे. (RangBahar Maifal)
यावर्षीच्या मैफलीमध्ये रोहित फाटक हे शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. तसेच चित्रकार प्रा. बाळासाहेब पाटील (सांगली), शिरीष देशपांडे (बेळगाव), स्वाती साबळे (मुंबई), प्रा. अमित सुर्वे (सावर्डे), प्रा. शीतल बावकर (मुंबई), प्रा. योगेश मोरे (कोल्हापूर), विवेक प्रभूकेळूस्कर(मुंबई), इनायत शिडवणकर(कोल्हापूर), सुरेंद्र कुडपणे (पुणे),  प्रथमेश जोग (पुणे), अशोक साळुंखे (पुणे), कशिश अडसूळ (कोल्हापूर), संदेश कांबळी (सिंधुदुर्ग), सुबोध कांबळे (कोल्हापूर), यश कातवरे (कोल्हापूर), कुलदीप जठार (कोल्हापूर), शिल्पकार विशाल मसणे (रत्नागिरी),  युवराज चिखलकर (कोल्हापूर), दीपक साळोखे, पेठवडगांव हे आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. रंगबहार मैफिलीचे हे ४८ वे वर्ष आहे. संस्थेची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरु आहे. संस्थेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. (RangBahar Maifal)

कार्यक्रमास सर्व कलारसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘रंगबहार’चे अध्यक्ष धनंजय जाधव, संजीव संकपाळ व्ही. बी. पाटील यांनी केले आहे.
कार्यक्रमचे संयोजन अमृत पाटील , प्रा. अजेय दळवी,  विजय टिपुगडे,  प्रा. मनोज दरेकर, प्रा.अभिजीत कांबळे, प्रा. मणिपद्म हर्षवर्धन, सुरेश मिरजकर, सुधीर पेटकर, विलास बकरे, सर्जेराव निगवेकर, अतुल डाके, राहुल रेपे, बबन माने, नागेश हंकारे, प्रा.गजेंद्र वाघमारे, प्रा.प्रवीण वाघमारे, सर्वेश देवरुखकर, प्रा. शैलेश राऊत, प्रा.किशोर राठोड, विजय उपाध्ये, सुदर्शन वंडकर करत आहेत.

हेही वाचा :
‘दमसा’च्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00