नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी मोदींनी कारवाई केली. व्यापार युद्धाची भिती दाखवून भारत पाकिस्तानमधील युद्ध् थांबवले या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन करण्याचे आव्हान राहूल गांधींनी दिले. पहलगाम हल्ल्याचे सुत्रधार पाकिस्तानी जनरल आसीम मुनीर यांच्याशी ट्रम्पच्या भेटीबद्दल मोदीनी मौन का स्वीकारले? यावर प्रश्न उपस्थित केला. (Rahul Gandhi)
भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्यासाठी व्यापाराचा वापर करण्याचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वारंवार केलेला दावा खोटा आहे आहे सांगण्याचे आव्हान राहूल गांधीनी पंतप्रधानांना केले. तसेच भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान लढाऊ विमाने पाडण्यात आल्याच्या आरोपांवर मोदींनी संसदेत ट्रम्प यांच्या विधानाचे खंडन करण्याचे आव्हान दिले. “जर नरेंद्र मोदींमध्ये इंदिरा गांधीइतके ५० टक्केही धाडस असेल तर त्यांनी सभागृहात जाहीर करावे की ट्रम्प युद्धबंदी खोटे बालत आहे हे सभागृहात जाहीर करावे, असे राहूल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi)
राहूल गांधी म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील सुत्रधार पाकिस्तानचे जनरल असीम मुनीर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी मुनीर यांच्यासोबत लंचला आमंत्रित करुन त्यांच्यासोबत बैठक घेतली. पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्या कृतीबद्दल काहीच वक्तव्य केले नाही. असिम मुनीर यांना ट्रम्प यांची त्यांच्या कार्यालयात आमंत्रित करण्याची हिम्मत कशी केली? असा प्रश्नही राहूल गांधी यांनी उपस्थित केली.
राहूल गांधी म्हणाले, “भारत सरकारने पाकिस्तान सरकारला कळवले की आमची राजकीय इच्छाशक्ती नाही. आम्हाला लढायचे नाही. आम्ही फक्त कारवाई केली आहे. आत्मसमर्पण करण्याची मागणी करण्यात आली होती, तात्काळ तीस मिनिटात आत्मसमर्पण करावे.
इंडोनोशियातील सरंक्षण अधिकारी शिवकुमार यांनी म्हटले ही की पाकिस्तानशी झालेल्या संघर्षादरम्यान भारताने आपली काही विमाने गमावली होती. राजकीय नेतृत्वाने घातलेल्या बंधनामुळेच हे घडले असेही राहूल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi)
राहूल गांधी म्हणाले, “आता, राजनाथ सिंह जी यांनी सांगितलेला दुसरा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कदाचित त्यांना ते म्हणायचे नव्हते, परंतु त्यांनी असेही म्हटले की त्यांनी पाकिस्तानी सैन्याला कळवले की आम्ही त्यांच्या कोणत्याही लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणार नाही. ही एक अतिशय मनोरंजक वस्तुस्थिती आहे आणि मी तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायला सांगतो. मी युद्धाच्या स्वातंत्र्याबद्दल बोललो, म्हणजे हवाई दलाला पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य देणे. आता, हे वाक्य काळजीपूर्वक ऐका. इंडोनेशियातील संरक्षण अटॅची कॅप्टन शिव कुमार म्हणाले, ‘भारताने इतकी विमाने गमावली या दाव्याशी मी सहमत नसू शकतो, परंतु मी सहमत आहे की आम्ही काही गमावले आहेत.” आणि हे केवळ राजकीय नेतृत्वाने पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनांवर किंवा त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालींवर हल्ला करू नये या बंधनामुळे घडले. दुसऱ्या शब्दांत, आम्ही पाकिस्तानात गेलो, हल्ला केला आणि आमच्या वैमानिकांना त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य करू नका असे सांगितले”, असे राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi)