Home » Blog » Manish Tiwari : ट्रम्प मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला

Manish Tiwari : ट्रम्प मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला

सर्वपक्षीय बैठकीची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Manish Tiwari

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाने फेटाळला आहे, असे काँग्रसचे खासदार मनिष तिवारी यांनी स्पष्ट केले. (Manish Tiwari)

खासदार मनिष तिवारी यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये तिवारी म्हणाले की, “अमेरिकेतील एखाद्याने त्यांच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गंभीरपणे शिकवण्याची गरज आहे की काश्मीर हा बायबलनुसार एक हजार वर्षे जुना संघर्ष नाही. तो २२ ऑक्टोबर १९४७ रोजी सुरू झाला. ७८ वर्षांपूर्वीचा संघर्ष  आहे, जेव्हा पाकिस्तानने स्वतंत्र जम्मू आणि काश्मीर राज्यावर आक्रमण केले.  जे नंतर २६ ऑक्टोबर १९४७ रोजी महाराजा हरि सिंह यांनी ‘पूर्ण’ स्वरूपात भारताला दिले.  ज्यामध्ये आतापर्यंत पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेले क्षेत्र समाविष्ट आहेत. ही साधी वस्तुस्थिती समजून घेणे किती कठीण आहे?” (Manish Tiwari)

काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली.  अनेक मुद्द्यांवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली.”भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुन्हा एकदा मागणी करते की पहलगाम, ऑपरेशन सिंदूर आणि युद्ध विरामाच्या च्या मुद्द्यावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावावी आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे. युद्ध विरामाची घोषणा प्रथम वॉशिंग्टन डीसीमध्ये आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान सरकारांनी केली, जेणेकरून या सर्व मुद्द्यांवर व्यापक चर्चा करता येईल,” जयराम म्हणाले.

“भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा असा विश्वास आहे की अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संवादासाठी “तटस्थ मंचा” चा उल्लेख केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात. आपण सिमला कराराचा त्याग केला आहे का? आपण तृतीय पक्षाच्या मध्यस्थीसाठी दरवाजे उघडले आहेत का? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विचारू इच्छिते की भारत आणि पाकिस्तानमधील राजनैतिक मार्ग पुन्हा उघडले जात आहेत का? आपण पाकिस्तानकडून कोणत्या वचनबद्धता मागितल्या आहेत आणि आपल्याला काय मिळाले आहे?” त्यांनी पुढे प्रश्न केला. (Manish Tiwari)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00