Home » Blog » Protest against Shakti Peetha : ‘शक्तिपीठ’ विरोधात शेतात तिरंगा फडकावून आंदोलन  

Protest against Shakti Peetha : ‘शक्तिपीठ’ विरोधात शेतात तिरंगा फडकावून आंदोलन  

by प्रतिनिधी
0 comments
Protest against Shakti Peetha

स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान असलेल्या लढवय्या कोल्हापूर जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळातही आपला लढावू बाणा टिकवून ठेवला आहे. अनेक प्रश्नांवर सरकारला नमवले आहे. आजच्या स्वातंत्र्य दिनी शिवारात तिरंगा फडकावून कोल्हापूरच्या शेतक-यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधातला आपला विरोध प्रखरपणे व्यक्त केला आहे. (Protest against Shakti Peetha)

प्रतिनिधी

शक्तिपीठ महामार्ग रेटण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतक-यांच्या विरोधानंतर चित्र बदलू लागले आहे. राज्याच्या अन्य भागातील शेतक-यांकडूनही विरोध होऊ लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्र्यांनाही शक्तिपीठच्या विरोधात भूमिका घेणे भाग पडले आहे. शक्तिपीठच्या विरोधात विविध मार्गांनी आंदोलने होत आहेत. रस्त्यावरचा संघर्षही तीव्र आहे. त्याचाच भाग म्हणून स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला एक अभिनव आंदोलन करण्यात आले. (Protest against Shakti Peetha)

 शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी ‘तिरंगा आमच्या वावरात शक्तीपीठ नको शिवारात’ अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी झालेल्या या आंदोलनामुळे शक्तीपीठ महामार्ग विरोधाला पुन्हा एकदा धार आली आहे. भुदरगड आणि कागल तालुक्यामध्ये विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आंदोलन केले. हातकंणगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन केले.

सतेज पाटील यांनी गारगोटी आकुर्डे रस्त्यावरील दौलत देसाई यांच्या शेतात शक्तिपीठ विरोधात तिरंगा फडकावून आदोलन केले. दुसऱ्या टप्प्यात कागल तालुक्यातील एकोंडी येथील शिवारामध्ये झेंडा फडकावण्यात आला.  यावेळी शेतकऱ्यांनी जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा दिल्या.

ज्या जमिनीतून  प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शिवारात तिरंगा झेंडा फडकावून हातकणंगले तालुक्यातील साजणी आणि शिरोळ तालुक्यातील निमशिरगांव येथील शिवारात स्वातंत्र्यदिनी आंदोलन करण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग बारा जिल्ह्यांमधून जाणार असला जाणार असला, तरी कोल्हापूरमधून त्याला सर्वाधिक विरोध आहे. या महामार्गामुळे शेतक-यांची सुपीक जमीन जाणार असल्याने शेतक-यांकडून विरोध होत आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग अस्तिवात असताना व तो तोट्यात चाललेला असताना राज्य सरकारकडून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी अनावश्यक शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या व राज्यातील जनतेच्या माथी मारला जात आहे. या महामार्गामुळे पुढील जवळपास नव्वद वर्षाहून अधिक काळ जनतेला टोल भरावा लागणार आहे. मूठभर उद्योगपतींना व त्यांच्या व्यवसाय वृध्दीला डोळ्यांसमोर ठेवून हा महामार्ग करण्याचा घाट फडणवीस सरकारकडून केला जात आहे. (Protest against Shakti Peetha)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00