नाशिक : सेवानिवृत्त प्राध्यापकाने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:ही साडीने गळफास लावून जीवन संपवले. नाशिकच्या जेलरोड परिसरात ही घटना घडली. लता मुरलीधर जोशी (वय ७६) आणि मुरलीधर रामचंद्र जोशी (८०) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. (Professor sucide)
परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती दिली. नाशिकच्या जेलरोड परिसरात जोशी दाम्पत्य अनेक वर्षे वास्तव्य करतात. त्यांची दोन्ही मुले कामधंद्यासाठी कुटुंबांसह मुंबईत राहतात. दोन्ही मुले अधूनमधून आईवडिलांना भेटायला येत. तर काही वेळा जोशी दाम्पत्य आपल्या मुलांकडे रहायला जात असत. पण गेल्या चार वर्षापासून लता जोशी या आजारापणामुळे अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्या देखरेखीसाठी महिला केअरटेकरही ठेवण्यात आली होती. संबंधित केअर टेकर चोवीस तास त्यांच्या सेवेत होती. (Professor sucide)
बुधवारी (९ एप्रिल) केअरटेकर काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. सायंकाळी सात वाजता त्या घरी परतल्या, तेव्हा मुरलीधर जोशी गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. तर त्यांची पत्नी मृतावस्थेत दिसून आल्या. केअर टेकरने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती काळली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी पाठविले. उपनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद झाली आहे. (Professor sucide)
आत्महत्येपूर्वी जोशींनी लिहिली चिठ्ठी
केअरटेकर घराबाहेर गेल्यावर मुरलीधर जोशी यांनी पत्नीचा गळा आवळून हत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानंतर स्वत: साडीने गळफास लावून जोशींनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी जोशींनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी ‘माझे पत्नी लतावर खूप प्रेम आहे. ती अंथरुणाला खिळून असून आजाराला वैतागून गेली आहे. तिला या आजारातून मुक्त करण्यासाठी व तिच्यासोबत मी पण मुक्त होत आहे. घरकाम करणाऱ्या सीमा हिने पत्नी लता हिची खूप सेवा केली आहे. तिच्यासाठी ५० हजार रुपये बाजूला काढून ठेवले आहेत. ते तिला देण्यात यावेत. (Professor sucide)
आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसेदेखील ठेवले असून अंत्यसंस्कारासाठी कोणीही खर्च करु नये. तसेच पत्नी लता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी, मंगळसूत्र, जोडवे घालून अंत्यसंस्कार करावेत’. हा मजकूर वाचून पोलिसही गहिवरुन गेले. (Professor sucide)
हेही वाचा :
बलात्कारासाठी संबंधित युवतीच जबाबदार
केंद्रीय मंत्र्यांच्या नातीची गोळ्या झाडून हत्या