नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते,’ अशी मुक्ताफळे भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी भर संसदेत उधळली. एका संताच्या भेटीचा संदर्भ देत पुरोहित यांनी हे वक्तव्य केले. त्यावर विरोधकांसह नेटिझन्सकडूनही टीकेची झोड उठवण्यात आली आहे. संसदेत काहीही बरळणाऱ्या या खासदाराने तत्काळ माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Pradeep Purohit)
पुरोहित हे भाजपचे बारगडचे खासदार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत भाषण करताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत नाही का, असा सवालही विरोधी पक्षांसह नेटिझन्सनी केला आहे. (Pradeep Purohit)
पुरोहित यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, माझी एका संताशी भेट झाली. या संताने सांगितले होते की पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. या दाव्याचे स्पष्टीकरण देताना या खासदाराने असे म्हटले की पंतप्रधान मोदी हे खरोखरच शिवाजी महाराज आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाला प्रगती आणि विकासाकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतला आहे.
तथापि, या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने पुरोहित यांना चांगलेच धारेवर धरले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या उज्ज्वल वारशाचा आणि त्यांच्या महानतेचा हा अवमान असल्याची टीका होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली असून, अशी तुलना शिवरायांसारख्या आदरणीय ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा अवमान करणारी असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यावर खासदार पुरोहित यांनी माफी मागावी, अशी मागणीही होत आहेत. (Pradeep Purohit)
शिवाजी महाराजांचा घोर अवमान : वर्षा गायकवाड
या लोकांनी याआधी नरेंद्र मोदींच्या मस्तकावर मानाचा जिरेटोप चढवला होता. आता या खासदाराने हे घृणास्पद वक्तव्य केले आहे. शिवाजी महाराजांचा हा घेर अपमान आहे.
शिवसेना (ठाकरे) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘भाजपच्या या निर्लज्ज चापलूसांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.(Pradeep Purohit)
पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशातील महान नेत्यांशी आणि योद्ध्यांशी तुलना करण्याचा प्रयत्न या आधीही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुरोहित यांनी केलेली तुलना म्हणजे निव्वळ चापलुसगिरी असल्याची टीका एका नेटिझन्सने केली आहे. (Pradeep Purohit)
असे लोक कुठून पैदा होतात? संजय राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊत म्हणाले, हे महाशय संसदेत संसदेत बोलत आहेत. नरेंद्र मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, असे हे म्हणत आहेत. यांची भाजपा खऱ्या शिवाजी महाराजांना मानत नाही. त्यांचे शिवाजी केवळ नरेंद्र मोदी आहेत. असे लोक कुठून पैदा होतात? असा हल्लोबोल करत भाजपने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा :
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही
सरकार, फडणवीस पुरस्कृत दंगल
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कबर तोडावी