Home » Blog » PM visit reshimbag : देशातील थोर संतांनी राष्ट्रीय विचार जिवंत ठेवले

PM visit reshimbag : देशातील थोर संतांनी राष्ट्रीय विचार जिवंत ठेवले

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे नागपूरमध्ये प्रतिपादन

by प्रतिनिधी
0 comments
PM visit reshimbag

नागपूर : प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी अनेक चळवळींनी काम केले. त्यामध्ये भक्ती आंदोलनाचा मोठा वाटा आहे. देशातील अनेक थोर संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय विचारांची भावना कायम जिवंत ठेवण्याच काम केले. समाजामध्ये असलेली दुरी संपवून सर्वांना एका सुत्रामध्ये बांधण्याचे काम भक्ती आंदोलनाने केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (PM visit reshimbag)

पंतप्रधान मोदी आज रविवारी चैत्र प्रतिपदा गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर नागपूर दौऱ्यावर आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर त्यांनी प्रकाश टाकून स्थापनेपासून संघाने देश आणि समाज रक्षाचे कसे कार्य कार्य केले, भारतीय संस्कृती कशी टिकवली यावर मार्गदर्शन केले. (PM visit reshimbag)

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतात शेकडो वर्षे परकियांनी आक्रमणे केली. अनेक क्रूर अक्रमकांनी आमच्या देशाची सभ्यता आणि संस्कृतीला धक्का लावण्याचे काम केले. परंतु भारतीयत्वाची मूळ जाणीव कुणीच संपवू शकले नाही. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी अनेक चळवळी झाल्या. त्यामध्ये थोर संताच्या भक्ती चळवळीचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. (PM visit reshimbag)

माधव नेत्रालय प्रिमियम सेंटर इमारतीचे भूमीपूजन

मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रिमियम सेंटर इमारतीचे भूमीपूजन झाले. संघाचे दुसरे सरसंघचालक एम.एस. गोळवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  माधव नेत्रालय स्थापन करण्यात आले आहे. या प्रकल्पात २५० खाटांचे रुग्णालय प्रस्तावित आहे. १४ बाह्यरुग्ण विभाग आणि ऑपरेशन थिएटर सेंटरमध्ये असणार आहे. (PM visit reshimbag)

पंतप्रधान मोदींची दीक्षाभूमीला भेट

पंतप्रधान मोंदीचे रविवारी सकाळी साडेआठ वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते थेट रेशिमबागेत गेले. त्यानंतर ते दीक्षाभूमीत गेले. मोदींनी दीक्षाभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचे दर्शन घेतले. भगवान गौतम बुद्धांनाही अभिवादन केले. (PM visit reshimbag)

संघ भेटीनंतर मोदींचा विशेष संदेश

पंतप्रधानपदाच्या ११ वर्षाच्या कारकिर्दीत नरेंद्र मोदी यांनी प्रथमच रेशीमबागेला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेष संदेश लिहिला आहे. संदेशात असे म्हटले आहे  “हेडगेवारजी आणि पूज्य गुरूजी यांना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या स्मृतींना जपणाऱ्या या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटन क्षमतांच्या मूल्यांना समर्पित ही जागा राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. संघाच्या या दोन महान स्तंभांची आठवण देणारी ही जागा देशसेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे”, असे पंतप्रधान मोदी यांनी अभिप्राय वहीत म्हटले आहे. (PM visit reshimbag)

हेही वाचा :

कोरटकरची कळंबा कारागृहात रवानगी

शेतकऱ्याचे दु:ख जाणणारा पोलिस अधिकारी हरपला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00