कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली, चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नागपूर शहरात मोका आणि एमपीडीए कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन गंभीर गुन्ह्यांमध्ये घट घडवून उत्कृष्ट कामगिरी केली. २०२० मध्ये कोरोना महामारी दरम्यान कायद्याची कडक अंमलबजावणी करून मानवतेची सेवा केली. त्यांच्या अशा उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहेत.(Phulari Awarded)
कोल्हापूर, सातारा, मिरज, विशाळगड येथील जातीय संघर्ष, हिंसाचार, मराठा आरक्षणविषयक आंदोलनांदरम्यान समाजात तणावाची परिस्थिती उद्भवली होतील. त्यावेळी त्यांनी जातीय सलोखा राखून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवल्या. सामाजिक (Community) पोलिसिंग उपाययोजनांची अंमलबजावणी करून सेवा (S.E.V.A.) प्रकल्पासारख्या नाविन्यपूर्ण योजना दुर्बल घटकांच्या मदतीसाठी राबविल्या. कोल्हापूर शहरातील दंगल परिस्थिती, विशाळगड अतिक्रमण, पुसेसावळी औंध दंगल अशा दंगलसदृश्य परिस्थितीत जातीय घटनांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कौशल्यपूर्ण मार्गाने व सुसंवादाने सर्व परिस्थिती स्वतः हाताळून शांतता निर्माण केली. जातीय घटनांचे इतरत्र पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरीता कठोर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. परिणामी मिरज, कराड, बार्शी, अक्कलकोट, जुन्नर, दौंड, खेड, औंध या पूर्ण भागात शांतता कायम राहिली.(Phulari Awarded)
नागपूर, जळगाव, सांगली, पुणे, नाशिक याठिकाणी कार्यरत असताना गंभीर आणि गुंतागंतीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे कार्य, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांचे कौशल्यपूर्ण कामकाज वाखाणण्याजोगे आहे. मोहल्ला समिती, शांतता समिती या माध्यमांद्वारे ‘सामाजिक सलोखा व शांतता कायम ठेवली. लोकसभा, विधानसभा २०२४ निवडणुका हिंसाचारमुक्त पार पाडण्यासाठी काम केले. काटेकोरपणे निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी केली. कोल्हापूर परिक्षेत्राला कर्नाटक आंतरराज्य सीमा आहे. समन्वय ठेवून व सीमावर्ती भागात तपासणी करून निवडणूक कालावधी दरम्यान कोणतीही अघटीत घटना घडणार नाही, याकरीता सातत्याने मार्गदर्शन केले. (Phulari Awarded)
हेही वाचा :
सैफवर हल्ला प्रकरणाला नवे वळण
एसटी भाडेवाडीचा दणका
पतंजली’च्या मिरची पूडमध्ये…