Home » Blog » Petition in Supreme Court on Mahadevi issue : ‘महादेवी’ प्रश्नी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका

Petition in Supreme Court on Mahadevi issue : ‘महादेवी’ प्रश्नी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका

by प्रतिनिधी
0 comments
Petition in Supreme Court on Mahadevi issue

मुंबई : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी जिनसेन मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत करा या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये  जनतेच्या तीव्र जनभावना लक्षात आल्या आहेत. यामुळे राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका  दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बैठकीला उप मुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, धैयर्शिल माने, सांगलीचे खासदार विशाल पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, डॉ. विश्वजीत कदम, राजेंद्र पाटील यड्रावकर, अशोकराव माने, राहूल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते. (Petition in Supreme Court on Mahadevi issue)

मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवी हत्तीची गुजरातच्या वनतारा हत्ती केंद्राकडे स्वाधीन केल्यानंतर तिला परत आणण्यासाठी जनआंदोलन उभारले आहे. रविवारी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकारकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी मुंबई बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.

बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नांदणी मठाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी, तसेच सरकार म्हणून देखील आम्हीही सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करणार आहे. महादेवी परत यावी अशी आमची भूमिका आहे. तिची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार करण्यात येईल. राज्य सरकार नांदणी मठासोबत पूर्ण पाकदीनिशी सोबत राहिल, असा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.  (Petition in Supreme Court on Mahadevi issue)

    यावेळी बैठकीत  बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि पेटा ही संस्था आर्थिक अमिष दाखवून वनतारा येथे पाळीव हत्ती देण्याची सुपारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने ज्या हत्ती वनतारा येथे पाठविण्यात आले आहेत त्यांची सध्या काय परिस्थती आहे याबाबत कोणतीही तपासणी राज्य सरकारने केलेली नाही. विटा येथील श्री नाथ मठाचा हत्ती २०२३ साली वनतारा येथे घेऊन गेले आहेत आज तो हत्ती तिथे आहे कि नाही याबाबत संशय निर्माण झालेला आहे. या घटनेची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील जवळपास चार ते पाच पाळीव हत्ती मयत झाले असल्याचे सांगितले.सदरची गंभीर गोष्टीबाबत  राज्य सरकारने सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वनविभागास दिले.

     पेटा व वनतारा यांच्याकडून माधुरी हत्ती घेऊन जाण्यासाठी षडयंत्र रचून न्यायव्यवस्था व प्रशासनाला बटीक करून वनतारा येथे पाठविण्यात आले आहेत. माधुरी हत्तीचे ११ वेळा वैद्यकीय तपासणी केली हे सर्व ११ अहवाल सकारात्मक आहेत. त्याबरोबरच कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक मठांना हत्ती घेऊन जाण्याबाबत नोटीसा देण्यात येत आहेत. यामुळे चांगल्या पध्दतीने देखभाल करूनही समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत.

         राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून हत्ती हे अनुसुचि १ म्हणजेच डोंगरी व कॅप्टीव्ह एलिफंट ( पाळीव हत्ती ) या दोन प्रकारात मोडतात. पाळीव हत्तीबाबत राज्य सरकारने विशेष कायदा करणे आवश्यक असून राज्य सरकारने स्वतंत्रपणे कायदा करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली. राज्य सरकारने जरी आज बैठक घेऊन सकारात्मकता दाखविली असली तरीही जोपर्यंत माधुरी हत्ती नांदणी मठात परत येणार नाही तोपर्यंत अंबानी उद्योग समुहाच्या सर्व गोष्टीवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन महाराष्ट्रासह कर्नाटक , राजस्थान , मध्यप्रदेश या राज्यात सुरू करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.  या बैठकीला नांदणी मठाचे जैन महास्वामी, वन विभागाचे अपर सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक डॉ. योगेश गुप्ता, भारचंद्र पाटील, सागर संभूशेटे, अड मनोज पाटील उपस्थित होते.  

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00