Home » Blog » मुंबई महापौरपद आरक्षणात फिक्सिंग?

मुंबई महापौरपद आरक्षणात फिक्सिंग?

by प्रतिनिधी
0 comments
Pednekar objects to the mayor reservation lottery

मुंबई : मुंबई महानगरपालिका महापौर पदाच्या आरक्षणात फिक्सिंग झाल्याची चर्चा आहे. अनुसुचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण डावलल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. आरक्षण सोडतीच्यावेळी उबाठाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतला. (Pednekar objects to the mayor reservation lottery)

मुंबईत मंत्रालयात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. मुंबई महानगरपालिकेत अनुसुचित जमातीचे तीन नगरसेवक नसल्याने हा प्रवर्ग आरक्षणातून वगळण्यात आला. या प्रवर्गाचे शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेला महापौरपद मिळू नये यासाठी आरक्षणातून अनुसुचित जमाती हा प्रवर्ग वगळण्यात आल्याची टीका होत आहे. मुंबई महानगरपालिकेत मागील २५ वर्षापासून ओबीसी आणि अनुसुचित जमाती प्रवर्गाला आरक्षण मिळालेले नाही. इतर महानगरपालिकेसाठी जी पद्धत अवलंबली त्यात मुंबईला का बाहेर काढण्यात आला असा सवाल किशोर पेडणेकर यांनी केला आहे. आरक्षण प्रक्रिया ठरवून केल्याचा आरोपही पेडणेकरांनी केला. (Pednekar objects to the mayor reservation lottery)

या सोडतीच्यावेळी शिवसेनेकडून माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, भाजपचे राजेश शिरवाडकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे उपस्थित होते. (Pednekar objects to the mayor reservation lottery)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00