Home » Blog » बुलेटप्रुफ लष्करी वाहन दरीत कोसळून दहा सैनिकांचा मृत्यू

बुलेटप्रुफ लष्करी वाहन दरीत कोसळून दहा सैनिकांचा मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
Ten soldiers killed in Doda district

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दोडा जिल्ह्यात बुलेटप्रुफ लष्करी वाहन खोल दरीत कोसळल्याने दहा लष्करी सैनिकांचा मृत्यू झाला तर ११ सैनिक जखमी झाले. दोडा जिल्ह्यात भदरवाह-चंबा रस्त्यांवर खन्नी टॉप येथे अपघात झाला. (Ten soldiers killed in Doda district)

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भादरवाह चंबा आंतरराज्य रस्त्याच्या एका उंच बर्फाळ भागात लष्कराचे वाहन एका उंच चौकीकडे जात असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि दरीत कोसळले. लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी बचाव कार्य हाती घेतले. घटनास्थळी चार सैनिकांचा मृत्यू झाला. जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. विशेष उपचारांसाठी विमानाने उधमपूर लष्करी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या अपघातात दहा जणांना मृत्यू झाला. तर ११ जवान जखमी झाले आहेत. (Ten soldiers killed in Doda district)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00