नवी दिल्ली : भारत सरकारच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (दि. २५ जानेवारी) प्रतिष्ठित ‘पद्म’ पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित केली. लोकसभेचे माजी सभापती आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि प्रसिद्ध गझलगायक पंकज उदास यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांचाही ‘पद्मभूषण’ विजेत्यांत समावेश आहे. (Padma Award)
श्री दुव्वुर नागेश्वर रेड्डी (औषध), न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंह खेहर- सार्वजनिक व्यवहार, श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लखिया- कला, लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम-कला, एम. टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर)- साहित्य आणि शिक्षण, ओसामू सुझुकी (मरणोत्तर)- व्यापार आणि उद्योग आणि श्रीमती. शारदा सिन्हा (मरणोत्तर) कलाक्षेत्रांतील योगदानाबद्दल पद्मविभूषण सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील वनअभ्यासक आणि साहित्यिक मारुती चित्तमपल्ली, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे, चित्रकार वासुदेव कामथ, सुलेखनकार अच्युत पालव, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते चैत्राम पवार यांना पद्मश्री सन्मान जाहीर करण्यात आला आहे. (Padma Award)
शिवाय गोवा स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोव्यातील शंभर वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांचाही समावेश आहे. त्यांनी १९५५ मध्ये जंगली भागात पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी भूमिगत रेडिओ स्टेशन ‘वोझ दा लिबरदाबे (व्हॉइस ऑफ फ्रीडम)’ सुरू केला होता. (Padma Award)
अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये पश्चिम बंगालमधील ५७ वर्षीय ढाक वादक गोकुल चंद्र डे यांचाही समावेश आहे. पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या या वाद्याचे त्यांनी दीडशे महिलांना प्रशिक्षण देऊन लैंगिक रूढी मोडून काढली. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगतज्ज्ञ, दिल्लीतील डॉ. नीरजा भाटला यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Padma Award)
-
पद्मश्री पुरस्कार विजेते
-
मारुती भुजंगराव चितमपल्ली (महाराष्ट्र)
-
विलास डांगरे (महाराष्ट्र)
-
चैत्राम पवार (महाराष्ट्र)
-
अशोक सराफ (महाराष्ट्र)
-
अश्विनी भिडे (महाराष्ट्र)
-
वासुदेव कामथ (महाराष्ट्र)
-
अच्युत पालव (महाराष्ट्र)
-
एल हँगथिंग (नागालँड)
-
हरिमन शर्मा (हिमाचल प्रदेश)
-
जुमदे योमगम गमलिन (अरुणाचल प्रदेश)
-
जोयनाचरण बठारी (आसाम)
-
नरेन गुरुंग (सिक्कीम)
-
शेख ए जे अल सबाह (कुवैत)
-
निर्मला देवी (बिहार)
-
भीमसिंग भावेश (बिहार)
-
राधा बहिन भट्ट (उत्तराखंड)
-
सुरेश सोनी (गुजरात)
-
पंडी राम मांडवी (छत्तीसगड)
-
जोनास मॅसेट (ब्राझील)
-
जगदीश जोशीला (मध्य प्रदेश)
-
हरविंदर सिंग (हरियाणा)
-
भेरू सिंग चौहान (मध्य प्रदेश)
-
व्यंकप्पा अंबाजी सुगातेकर (कर्नाटक)
-
पी दत्तचनमूर्ती (पुडुचेरी)
-
लिबिया लोबो सरदेसाई (गोवा)
-
गोकुल चंद्र दास (पश्चिम बंगाल)
-
ह्यू गँटझर (उत्तराखंड)
-
कॉलीन गँट्झर (उत्तराखंड)
-
डॉ नीरजा भाटला (दिल्ली)
-
सायली होळकर (मध्य प्रदेश)
-
गायिका जसपिंदर नरूला
-
गायक अरिजीत सिंग