Home » Blog » Nilesh Chavan arrested: निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक

Nilesh Chavan arrested: निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक

by प्रतिनिधी
0 comments
Nilesh Chavan arrested

मुंबई : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण याला शुक्रवारी (३०मे) अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमध्ये पकडले. त्याता घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पथक परत येणार आहे. वैष्णवीच्या हत्येनंतर तिच्या मुलाला घेऊन चव्हाणने अज्ञात ठिकाणी ठेवले होते. त्याचे नाव पुढे आल्यानंतर तो फरार झाला होता. (Nilesh Chavan arrested)

त्याने वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमक्याही दिल्या होत्या. प्रकरणाची तीव्रता वाढल्यानंतर यात निलेश चव्हाणचे नावही पुढे आले. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी- चिंचवड पोलीस त्याच्या मागावर होते. पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथके चव्हाणचा शोध घेत होती. तो नेपाळ येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिस तत्काळ तिकडे रवाना झाले. या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. (Nilesh Chavan arrested)

कुणालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री

चव्हाणला बेड्या ठोकल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे कौतुक केले. तसेच या प्रकरणात जे कुणी असतील त्यांना सोडणार नाही. कसल्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नाही. या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांना अत्यंत कडक शिक्षा झालीच पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार आहे, अशी प्रतिक्रियाही फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा :
वैष्णवीच्या मुलाचा सांभाळ तिच्या आईकडेच 
भाजपच्या माजी नेत्याच्या मुलासह तिघांना सक्तमजुरीची शिक्षा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00