Home » Blog » नीट आंदोलनातील रिया अहिरला धमकी देण्याऱ्यांवर कारवाई करा

नीट आंदोलनातील रिया अहिरला धमकी देण्याऱ्यांवर कारवाई करा

by प्रतिनिधी
0 comments
Take action against those threatening Riya Ahir

जमीर काझी : मुंबई : ‘नीट’ पेपर फुटीच्या विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर या तरुणीला सोशल मीडियावर सतत धमक्या मिळत आहेत. सरकारविरोधात आवाज उठल्यामुळे तिला प्रचंड त्रास दिला जात असून धमकी देणाऱ्यांना अटक करावी व आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसने केली आहे. (Take action against those threatening Riya Ahir)

 युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस सुरभी द्विवेदी, ॲड. ऋषभ रंजन, हरगुन सिंग यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस सहआयुक्त मनोज शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले. (Take action against those threatening Riya Ahir)

रिया अहिर आणि मुस्कान कन्नौजिया यांसारख्या महिला ‘क्रिएटर्स’ना  बलात्काराच्या धमक्या देणाऱ्या, ऑनलाइन छळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावर खटला चालवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. २७ वर्षीय रिया गेल्या सहा वर्षांपासून अभिनय आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहे. तिने २५ जुलैला सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार नोंदवली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. असे  शबरीन यांनी सांगितले. (Take action against those threatening Riya Ahir)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!