रायपूर : छत्तीसगडमधील बस्तर भागात सुरक्षा दलांनी गुरुवारी चकमकीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. ही चकमक अद्याप सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. सकाळी ९ पासून ही चकमक सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. (Naxal Killed)
बिजापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जंगलामध्ये ही चकमक सुरू आहे. राज्य पोलिसांचे जिल्हा राखीव दल (डीआरजी), कोब्रा पथकाच्या तीन तुकड्या आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाची २२९ वी तुकडी संयुक्तपणे या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात गुरुवारी दोन जवान जखमी झाले. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी या स्फोटाबाबत माहिती दिली. दोन्ही जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. (Naxal Killed)
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र केली असताना या स्फोट झाला. १२ जानेवारी रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले होते. त्यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश होता. छत्तीसगडमध्ये या वर्षी आतापर्यंत ठार केलेल्या नक्षलवाद्यांची संख्या २६ वर पोहोचली आहे. (Naxal Killed)
हेही वाचा :
सलमान, सिद्दीकी आणि सैफ