Home » Blog » National Herald Case: सोनिया, राहुल यांच्याविरूद्ध आरोपपत्र

National Herald Case: सोनिया, राहुल यांच्याविरूद्ध आरोपपत्र

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ‘ईडी’ची कारवाई

by प्रतिनिधी
0 comments
National Herald Case

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी (१५ एप्रिल) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. राहुल आणि सोनिया यांच्याशी संबंधित कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांच्या ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी ईडीने कारवाई सुरू केली होती. त्यानंतर काही दिवसांतच हे आरोपपत्र दाखल केले आहे.(National Herald Case)

या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये नवी दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊसचा समावेश आहे.(National Herald Case)

नॅशनल हेराल्डची मालमत्ता जप्त करणे हा राज्य-पुरस्कृत गुन्हा आहे. श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणे हे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी बेदरकारपणे चालवलेले सूड आणि धमकीचे राजकारण आहे. काँग्रेस आणि पक्षाचे नेतृत्व गप्प बसणार नाही. सत्यमेव जयते!

जयराम रमेश, काँग्रेस नेते

नॅशनल हेराल्डचे प्रकाशक एजेएल ही यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीत प्रत्येकी ३८% हिस्सा आहे. त्यामुळे ते बहुसंख्य भागधारक ठरतात.(National Herald Case)

ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या कलम ८ आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक (जप्त किंवा गोठवलेल्या मालमत्तांचा ताबा घेणे) नियम, २०१३ च्या संबंधित तरतुदींनुसार एजेएल मनी लाँड्रिंग प्रकरणातील चौकशीचा भाग असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) स्पष्ट केले आहे.
दरम्यान, हरियाणातील एका जमीन प्रकारात मनी लाँड्रिंग झाल्याच्या प्रकरणात ईडीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची ईडीने चौकशी केली. वड्रा मंगळवारी (१५ एप्रिल) सकाळी ईडी कार्यालयात दाखल झाले. हरियाणातील शिकोहपूर येथील एका जमीन व्यवहाराशी संबंधित हे प्रकरण आहे.

हेही वाचा :
अलाहाबाद हायकोर्टाच्या टिप्पणीवर आक्षेप
‘ईडी’कडून मनी लॉड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रांची चौकशी

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00