Home » Blog » MVA Agitate : ‘मविआ’ची सरकारविरोधात निदर्शने

MVA Agitate : ‘मविआ’ची सरकारविरोधात निदर्शने

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आक्रमक घोषणाबाजी

by प्रतिनिधी
0 comments

नागपूर : विशेष प्रतिनिधी : जनमत विरोधी असतानाही ईव्हीएममुळे हे सरकर निवडून आले, असा आरोप करीत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे यावेळी काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हातात प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन घेऊन विरोधकांनी आक्रमक घोषणाबाजी केली. (MVA Agitate)

मरकडवाडी येथे ग्रामस्थांनी ईव्हीएमला विरोध करून बॅलेटवर निवडणूक घेण्याची मागणी केली. मात्र त्यांना विरोध करण्यात आला. येणाऱ्या काळात बॅलेटवर निवडणूक घेतली पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन छेडणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मागणी केली.(MVA Agitate)

हेही वाचा :

नेहरू, पटेल, पंतप्रधानपद आणि आपले विश्वगुरूजी!
भाजपकडून तरुणांना एकलव्यासारखी वागणूक

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00