कोल्हापूर : प्रतिनिधी : वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनने (विफा) महाराष्ट्रातील फुटबॉलचा विकास आणि प्रचारासाठी उत्कृष्ट योगदान, नेतृत्वाबद्दल कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे (केएसए) चीफ पेट्रन खासदार शाहू छत्रपती यांचा छत्रपती शिवाजी महाराज सन्मान जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसेच केएसए चे फुटबॉल सेक्रेटरी व राष्ट्रीय पंच राजेंद्र दळवी यांचा विफा विशेष ओळख पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता मुंबईतील कुपरेज फुटबॉल स्टेडियमवरील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (MP Shahu Chhatrapati felicitated by ‘VIFA’)
महाराष्ट्राच्या फुटबॉल इतिहासात कोल्हापूरचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेक पिढ्यांपासून कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळला जातो. फुटबॉल ही कोल्हापूर जिल्ह्याची संस्कृती, ओळख आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. जुने क्लब, तालमी आणि मंडळांचे संघ, त्यांचे समर्थक, प्रेक्षकांचा सामन्यांना मिळणारा उदंड प्रतिसाद यामुळे कोल्हापूर महाराष्ट्रातील फुटबॉलचे एक प्रमुख केंद्र बनवले आहे.
कोल्हापूरच्या राजघराण्याने पिढ्यानपिढ्या क्रीडा संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या सततच्या मार्गदर्शनाखाली आणि छत्रछायेखाली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने खेळाडू, प्रशिक्षक, क्लब आणि तरुण फुटबॉलपटूंना खेळात सहभागी होण्याची, प्रगती करण्याची आणि उच्च ध्येय गाठण्याची संधी देत ही अभिमानास्पद परंपरा पुढे नेली आहे. त्याबद्दल शाहू छत्रपतींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (MP Shahu Chhatrapati felicitated by ‘VIFA’)
जिल्हा फुटबॉलची सातत्यपूर्ण ताकद, कोल्हापूरचे पारंपारिक क्लब आणि स्पर्धांचे जतन, तळागाळातील व युवा फुटबॉलपटूंना दिलेले प्रोत्साहन, आणि राज्य व राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या फुटबॉल उपक्रमांचे आयोजन यामुळे कोल्हापूरची ओळख महाराष्ट्रातील फुटबॉलचे खरे केंद्र म्हणून सातत्याने होत राहिली आहे. (MP Shahu Chhatrapati felicitated by ‘VIFA’)