पॅरिस : ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य, शिक्षण, कृषी यांसारख्या क्षेत्रांतील सुधारणांद्वारे कोट्यवधी लोकांचे आयुष्य बदलण्यासाठी होऊ शकतो. त्याअर्थाने एआय हे मानवतेसाठी कोडच लिहित आहे,’ असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (११ फेब्रुवारी) पॅरिस येथे काढले. एआय समिट या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (Modi AI)
मोदी हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह एआय समिट परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहेत. मंगळवारी या परिषदेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी केलेल्या भाषणामध्ये मोदी यांनी निष्पक्षपाती आणि लोकशाहीवादी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरस्कार केला. ‘अर्थव्यवस्था, सुरक्षा आदी क्षेत्रांना नवा आकार देण्यास एआयने अगोदरच सुरुवात केली आहे. या शतकामध्ये एआय मानवतेसाठी कोड लिहित आहे. एआयशी संबंधित मुद्दे हाताळण्यासाठी आपल्याला जागतिक स्तरावर मानके निश्चित करण्याची गरज आहे,’ असे मोदी म्हणाले. (Modi AI)
आरोग्य, शिक्षण, कृषी यांसारख्या बऱ्याच क्षेत्रामध्ये सुधारणा करून एआय कोट्यवधी लोकांचे आयुष्य बदलू शकते. शाश्वत विकासाची ध्येये सोपी आणि वेगवान होतील, असे जग निर्माण करण्यास सहायक ठरण्याची क्षमता एआयमध्ये आहे. यासाठी विश्वास आणि पारदर्शकता वाढवतील, अशा ‘ओपन-सोर्स सिस्टिम’ आपण विकसित केल्या पाहिजेत. त्याबरोबरच, सायबर सुरक्षा, माहितीचा विपर्यास आणि डीपफेक आदींशी संबंधित चिंतांकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. रोजगारांवर येणारे गंडांतर ही एआयशी संबंधित सर्वांत मोठी भीती आहे. परंतु, तंत्रज्ञानामुळे मानवी काम नाहीसे होत नसते, केवळ त्याचे स्वरूप बदलते, हे इतिहासाने आपल्याला दाखवून दिले आहे. एआय आधारित भविष्यासाठी आपण लोकांच्या कौशल्यवर्धनावर गुंतवणूक केली पाहिजे, असेही मोदी यांनी नमूद केले. (Modi AI)
भारताने अत्यंत कमी खर्चामध्ये १.४ अब्ज लोकांसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यशस्वीरीत्या उभारल्या आहेत. या सर्व सुविधा खुल्या आणि सर्वांना उपलब्ध असणाऱ्या नेटवर्कच्या आधारे उभारण्यात आल्या आहेत. आजघडीला तांत्रिक व न्यायविषयक उपाययोजनांसाठी एआयचा स्वीकार करण्यामध्ये भारत अग्रेसर आहे. जगातील सर्वांत मोठे एआयविषयक गुणवत्तेचे संचय आम्ही निर्माण केले आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (Modi AI)
Addressing the AI Action Summit in Paris. https://t.co/l9VUC88Cc8
— Narendra Modi (@narendramodi) February 11, 2025
हेही वाचा :