Home » Blog » राष्ट्रवादीच्या संविधानातून पटेल- तटकरेंनी अल्पसंख्याक, ओबीसी सेल वगळले  : रोहित पवार

राष्ट्रवादीच्या संविधानातून पटेल- तटकरेंनी अल्पसंख्याक, ओबीसी सेल वगळले  : रोहित पवार

by प्रतिनिधी
0 comments
Minority Cell has been removed from the NCP's constitution

जमीर काझी : मुंबई : अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर कब्जा मिळविण्यासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या घटनेत अनेक बदल केले आहेत. अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल काढून टाकल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

   पटेल यांना अमर्याद अधिकार देण्यासाठी करण्यात आले असल्याचे सांगून ते म्हणाले की,’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संविधानात आणखी काही बदल केल्याची बाब समोर आली आहे. पक्षाचा कणा असणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल नवीन संविधानातून काढून टाकण्यात आले आहेत. एकत्रित राष्ट्रवादीच्या संविधानात एकूण सात फ्रंटल सेल नमूद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या संविधानात केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल या सेलचा समावेश असल्याचे उघड झाले. (Minority Cell has been removed from the NCP’s constitution)

 आमदार रोहित पवार म्हणाले,  पटेल, सुनील तटकरे, ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि आणखी एका व्यक्तीच्या सह्या आहेत. या सह्या कशावर त्यांनी केल्या आहेत, एकतर त्यांनी खोटे सांगितले की त्यांची घटना जे आहे, प्रत्येक पक्षाची एक घटना असते. हे बदलण्यात आले आहे. त्यात जे कार्याध्यक्ष असतील त्यांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले जातील. अजितदादांना जाऊन फक्त १८ दिवस झाल्यानंतर हे पत्र सुनेत्रा काकींना न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता इलेक्शन कमिशनला देण्यात आलं. यानंतर सुनेत्रा काकींनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून त्यात पक्षाकडून करण्यात आलेला पत्र व्यवहार रद्द करण्यात यावा,अशी मागणी केली होती. याबाबत रोहित पवारांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना बदलत संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. (Minority Cell has been removed from the NCP’s constitution)

या वादा दरम्यान रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील बॅनरवर पक्षाचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार आणि विद्यमान अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना वगळण्यात आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा रायगडच्या इंदापूर येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातील बॅनरवरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. पक्षाचा कार्यक्रम असताना बॅनरवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि दिवंगत ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा फोटो लावण्यात न आल्याने अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली होती.

 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटीसाठी रोहित पवाराकडून पाच कोटीचे पॅकेज

. रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आणि  नेते बदनाम करण्यासाठी पाच कोटीचे पॅकेज हे एका एजन्सीला दिले आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांना पगार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोटे आरोप करण्यासाठी काही लोकांच्या नेमणूका केल्या आहेत,असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केला आहे. ते म्हणाले,’गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न तुतारी गटाकडून सातत्याने केला जात आहे. तुतारी गटाचे स्वतः च्या पक्षाकडे जेवढे लक्ष नाही तेवढे लक्ष आमच्या पक्षावर आणि नेत्यांवर आहे. ओबीसी सेल, सामाजिक न्याय सेल किंवा इतर सेल असतील अशी अर्धवट माहिती माध्यमांना दिली आहे. आमच्या घटनेत पक्ष स्थापनेपासून फ्रंटलचे पाच विभाग आहेत. फ्रंटलमध्ये फादर बॉडी, महिला कॉग्रेस, युवक, विद्यार्थी, सेवादल यांचा समावेश आहे. हेच दाखवून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम तुतारी गटाने केले आहे. त्यांनी ओबीसी सेल, सामाजिक न्याय सेल, अल्पसंख्याक सेल हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आले आहे असा खोटा बनाव केला आहे. हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते तर ते सेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते,असे त्यांनी स्पष्ट केले. (Minority Cell has been removed from the NCP’s constitution)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00