Home » Blog » मेस्सीने केले स्वत:च्या ७० फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन

मेस्सीने केले स्वत:च्या ७० फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन

by प्रतिनिधी
0 comments
Messi inaugurated the 70-foot statue

कोलकोता : जगभरातील फुटबॉल शौकिनाच्या गळयातील ताईत असलेला अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तीन दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. आज शनिवारी पहिल्याच दिवशी कोलकोता येथे उभारण्यात आलेल्या ७० फूट उंची मेस्सीच्या पुतळ्याचे अनावरण स्वत: मेस्सीने केले. फिफा विश्वचषक उंचावणाऱ्या मेस्सीचा पुतळा उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बॉलिवूड किंग खान शाहरुख खान, त्याचा मुलगा अब्राहम आणि उरुग्वेचा फुटबॉलपटू लुईस सुआरेझ उपस्थित होती. यावेळी मेस्सीच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. (Messi inaugurated the 70-foot statue)

लेक टाऊनमध्ये बसवण्यात आलेल्या पुतळ्यामुळे मेस्सी आणि त्याची टीम खूप आनंदी आहे, अशी माहिती पश्चिम बंगालचे मंत्री आणि श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष सुजीत बोस यांनी सांगितली. मेस्सीचे पहाटे अडीच वाजता कोलकोत्यात आगमन झाले. त्याच्या स्वागतासाठी फुटबॉल चाहत्यांची झुंबड उडाली होती. मेस्सीने मध्यरात्रीच्या जल्लोषाची दृश्ये सोशल मिडियावर टाकली आहेत. यापूर्वी फुटबॉलवेड्या कोलकोत्ता शहाराला महान फुटबॉलपटू पेले, दियागे मारडोना ब्राझिडला डुंगा, मोरो सिल्वा, कोलंबियाच रेने हिगुइटा, जर्मनीचा ऑलिव्हर कान यांनी भेट दिली होती. (Messi inaugurated the 70-foot statue)

पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगी त्याला पाहण्यासाठी साल्ट लेक स्टेडियमवर चाहत्यांनी साडेबारा हजार किंमतीची तिकीटे खरेदी करुन गर्दी केली होती. पण राजकारणी, सेलब्रिटीच्या गर्दीत असलेल्या मेस्सीची झलक पहायला न मिळाल्याने मैदानावरील उपस्थितांनी गोंधळ घातला. अनेक प्रेक्षकांनी मैदानावर बाटल्या फेकून संतापाला वाट मोकळी करुन दिली. काही हुल्लडबाज प्रेक्षकांनी बॅनर आणि खुर्च्यांची तोडफोड केली. लोक अधिकारी आणि राजकारण्यांना शिविगाळ करत होते. या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा रक्षक धावले. या गोंधळात मेस्सीने मैदान सोडल्याने चाहत्यांची घोर निराशा झाली.  (Messi inaugurated the 70-foot statue)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00