Home » Blog » Los angeles wildfires : अग्नितांडव; तीन लाखांवर लोक ‘बेघर’

Los angeles wildfires : अग्नितांडव; तीन लाखांवर लोक ‘बेघर’

लॉस एंजिल्समधील जंगलाला आग, हॉलिवूड सेलिब्रेटीजची घरे खाक

by प्रतिनिधी
0 comments
Los angeles wildfires

लॉस एंजिल्स : अमेरिकेच्या काही प्रांतात एकीकडे तुफान बर्फवृष्टी सुरू असताना असताना लॉस एंजिल्सच्या जंगलात भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. अजूनही आग सुरूच आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक घरे पडली आहेत. वाहने खाक झाली. जवळपास दहाहजार एकरवर ही आग पसरली आहे. जंगलाशेजारी असलेल्या वस्तीला या आगीने लपेटले. हॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रेटींची घरे भस्म झाली. १९०० इमारती जळून खाक झाल्या आहेत. तीन लाखांवर लोक बेघर झाले आहेत. (Los angeles wildfires)

नामवंत शैक्षणिक संस्थांना आगीचा फटका बसला आहे. शाळा-महाविद्यालये बंद ठेवली आहेत. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात आहे. आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ५० हजार लोकांनी ताबडतोब घरे खाली केली. तीन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. विमान आणि हॅलिकॉप्टरनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. वेगवान वाऱ्यामुळे आग सर्वत्र भडकली असून ७५०० फायर फायटर्स आग विझवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. (Los angeles wildfires)

हॉलिवूड कलाकारांच्या घरांना फटका

हॉलिवूड कलाकारांच्या घरांना आगीची मोठी झळ बसली. पॅलिसेडेसमधील अनेक हॉलिवूड कलाकारांची घरे जळून खाक झाली. त्यामध्ये पॅरिस हिल्टन, स्टिव्हन स्पिलबर्ग, मॅडी मूर, एश्टन कूचर यांच्या घरांना फटका बसला आहे. पॅरिस हिल्टनने ७२ कोटी रुपये खचून घर बनवले होते. अनेक सेलिब्रेटीजना घर सोडून दुसरीकडे आसरा घेण्याची वेळ आली. रस्त्यांवर सर्वत्र राखच राख दिसते.

शाळा, कॉलेज बंद

आगीचा धोका लक्षात घेऊन शाळा आणि कॉलेज बंद ठेवली आहेत. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) या नामवंत संस्थेने पासाडेना कँपसमधील क्लासेस बंद ठेवले आहेत. कँपसमध्ये राहणारे सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. त्यांना पाणी, खाद्यपदार्थ, मास्क अशा अत्यावश्यक वस्तू देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी कँपसच्या बाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. पेपरडाईन युनिव्हर्सिटीने कैलाबास आणि मलिबू हे दोन्ही कँपस बंद केले आहेत. तसेच परीक्षाही रद्द केल्या आहेत. (Los angeles wildfires)

यूएससी आणि यूसीएलएचे परिस्थितीवर लक्ष

युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया(यूएससी)ने आपल्या वेबसाईटवर आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. जंगलाला लागलेल्या आगीमुळे झळ बसलेल्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी सुपरवायझरना सांगितले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजिल्स (यूसीएलए) मध्ये क्लासेस सुरू आहेत. आमच्या कॅम्पसला धोका नसून हवेची गुणवत्ताही चांगली आहे. तरीही आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचे युनिव्हर्सिटीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

पाच मिनिटे श्वासही घेता येत नव्हता!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00