नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हा मुलगा. जगणं त्याच्यासाठी मोठे आव्हान झाले होते. त्याच्या ओटीपोटाचा घेर वाढला होता. त्यामुळे शाळेतील सहकारी, शेजाऱ्याच्या दृष्टीने तो चेष्टेचा विषय बनला होता. त्याला जगणे अक्षरश: नकोसे झाले होते. शाळाही याच कारणाने सोडून दिली. वयाच्या १७ व्या वर्षी त्याला असह्य त्रास होऊ लागला. त्याला दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याची तपासणी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. त्याच्या पोटात जुळे होते.(Life-changing surgery)
डॉक्टरांच्यादृष्टीने ही घटना आश्चर्यकारक होती. त्याहून आव्हानात्मक त्याच्यावरील शस्त्रक्रिया. पण हे आव्हान डॉ. आसुरी कृष्णा यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने स्वीकारले. शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. तपासणी करण्यात आली. त्याच्या पोटातील हे जुळे अविकसीत होते. ते मुलाच्या छातीच्या धमनीद्वारे टिकून राहिले होते. ‘एम्स’ रुग्णालयात दोन तास शस्त्रक्रिया करून ते काढून टाकण्यात पथकाला यश आले. (Life-changing surgery)
डॉ. कृष्णा म्हणाले, स्कॅनवेळी हे जुळे किशोरवयीन मुलाच्या छातीच्या हाडांशी जोडल्याचे दिसून आले. त्याच्या छातीतील रक्तवाहिनीतून त्याला रक्तपुरवठा होत होता. परंतु यकृत किंवा मूत्रपिंडासारख्या इतर मुख्य अवयवांशी फारसा संबंध नव्हता. त्यांना या मुलाच्या ओटीपोटात एक मोठे गळूही आढळले. पथकाने शस्त्रक्रिया दोन टप्प्यांत करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा जुळे काढून टाकण्यात आले. सामायिक रक्तवाहिन्या, नसा आणि ऊतींचे जाळे वेगळे करावे लागले. मुलाच्या अवयवांना किंवा ऊतींना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागली.
शस्त्रक्रियेदरम्यान, मुलाचा रक्तदाब धोकादायकरीत्या कमी झाला. परंतु डॉक्टरांनी त्वरीत तो स्थिर केला.
रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ आणि प्लास्टिक सर्जनसह डॉक्टरांच्या पथकाने अडीच तासांत ही प्रक्रिया पूर्ण केली.
चार दिवसांनी किशोरला डिस्चार्ज देण्यात आला. तो निरोगी आहे आणि त्याला शस्त्रक्रियेमुळे कोणतीही गुंतागुंत झाली नाही, असे डॉ. कृष्णा सांगतात.(Life-changing surgery)
दुर्मिळातील दुर्मिळ घटना
वैद्यकीय क्षेत्रातील अतिदुर्मिळ अशी ही घटना आहे. लाखात एखादीच अशी केस आढळते, असे डॉ. कृष्णा सांगतात. असे परजीवी जुळे अविकसित असते. जागतिक पातळीवर अशी केवळ ४०-५० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे अशी शस्त्रक्रिया करताना काय काळजी घ्यायची, याचे आव्हान होते. त्यामुळे आमच्या पथकाला सद्सद्विवेक, कौशल्य आणि आतापर्यंत मिळालेल्या ज्ञानावरच अवलंबून रहावे लागले. यात आम्ही यशस्वी झालो.
वैद्यकीय क्षेत्रातील अतिदुर्मिळ अशी ही घटना आहे. लाखात एखादीच अशी केस आढळते, असे डॉ. कृष्णा सांगतात. असे परजीवी जुळे अविकसित असते. जागतिक पातळीवर अशी केवळ ४०-५० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे अशी शस्त्रक्रिया करताना काय काळजी घ्यायची, याचे आव्हान होते. त्यामुळे आमच्या पथकाला सद्सद्विवेक, कौशल्य आणि आतापर्यंत मिळालेल्या ज्ञानावरच अवलंबून रहावे लागले. यात आम्ही यशस्वी झालो.
डॉ. आसुरी कृष्णा, ‘एम्स,’ नवी दिल्ली